शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (06:55 IST)

मकर संक्रांती विशेष : कधी आहे मकर संक्रांती, त्याचे महत्त्व जाणून घ्या

Makar Sankranti 2021
मकर संक्रांती 2021 : यंदाच्या वर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांती चे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य धनु राशी मधून मकर राशीमध्ये प्रवेश करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणायन पासून उत्तरायण होतात. सूर्याचे उत्तरायण होणं खूप शुभ मानले आहे. 
 
पौराणिक मान्यता -
पौराणिक मान्यतेनुसार, असुरांवर भगवान विष्णूंचा विजय म्हणून देखील मकरसंक्रांती साजरी केली जाते. आख्यायिका आहे की मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू ने पृथ्वी लोकांवर असुरांचा संहार करून त्यांचे शिरविच्छेद करून मंदरा पर्वत वर गाडले. तेव्हा पासून भगवान विष्णूच्या विजय ला मकर संक्रांती उत्सव म्हणून साजरा केला जातो.  
 
* दान -पुण्य आणि स्नानाचे महत्त्व आहे -
या निमित्ताने लाखो भाविक गंगा आणि पवित्र नदीच्या काठी स्नान आणि दान करतात. पौराणिक मान्यतेनुसार स्वतः भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, जो व्यक्ती मकर संक्रांतीवर देहाचा त्याग करतो त्याला मोक्षप्राप्ती होते आणि तो जीवन-मरण्याच्या चक्रातून मुक्त होतो. 
 
* सिद्धी प्राप्तीसाठी हा विशेष दिवस आहे-  
असे मानले जाते की जो पर्यंत सूर्य पूर्वी कडून दक्षिणेकडे जातो, या दरम्यान सूर्याच्या किरणांना वाईट मानले आहे.परंतु जेव्हा सूर्य पूर्वीकडून उत्तरेकडे जाऊ लागतो, तेव्हा त्याचे किरण आरोग्य आणि शांती देतात.या कारणा मुळे संत लोक जे आध्यात्मिकतेशी जुडलेले आहे त्यांना शांती आणि सिद्धी प्राप्त होते.  
 
* निसर्गात बदल होतात - 
मकर संक्रांती पासूनच ऋतुमध्ये बदल होऊ लागतो. शरद ऋतु क्षीण होऊ लागतो आणि वसंताचे आगमन सुरू होते. या मुळे दिवस मोठे होतात आणि रात्र लहान होते.