मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (10:59 IST)

स्वस्त स्मार्टफोन मध्ये काढता येतील HD फोटो, कसे काय जाणून घ्या

दिग्गज तंत्रज्ञान कंपनी गूगल आपल्या Google Camera Go अ‍ॅप साठी एक नवीन फीचर आणत आहे. ज्याच्या द्वारे आता स्वस्त फोन मधून देखील छान फोटो काढले जाऊ शकतात. सांगू इच्छितो की एंट्री लेव्हल स्मार्टफोन मध्ये आपल्याला Google Camera Go अ‍ॅप दिसते. या अ‍ॅप ला कंपनीने या वर्षी मार्च मध्ये त्या फोन्स साठी लॉन्च केले होते जे फोन अँड्रॉइड च्या एडिशन ऑपरेटिंग सिस्टिम वर काम करतात.
 
गूगलने आणले नवीन कॅमेरा वैशिष्टये किंवा फीचर -
गूगल आपल्या कॅमेरा गो अ‍ॅपच्या नवीन अपडेट मध्ये HDR (हाय डायनॅमिक रेंज)सपोर्ट आणत आहे. एचडीआर मोड म्हणजे आता या अ‍ॅप ने जास्तीत जास्त डिटेल आणि चांगल्या रंगांचे फोटो घेतले जाऊ शकतात. कंपनीने आपल्या या गोष्टीचा खुलासा अधिकृत ट्विटर अकाउंट वर केला आहे. गूगलने लिहिले आहे की 'कॅमेरा गो अ‍ॅप सातत्याने सुधारत आहे'. आम्ही अधिक अँड्रॉइड डिव्हाईस साठी HDR आणत आहोत ज्या मुळे कोणत्याही वेळी डिटेल्स सह फोटो काढू शकतो. 
 
ऑक्टोबर मध्ये नाईट मोड आले होते -
हे वैशिष्ट्ये OTA अपडेट द्वारे चालू केले जाऊ शकते. या पूर्वी ऑक्टोबर मध्ये गूगल ने ह्याच अ‍ॅप साठी नाईट मोड वैशिष्टये आणले होते. या वैशिष्ट्यामध्ये कमी प्रकाशात आणि फ्लॅश शिवाय देखील हाय क्वालिटीचे फोटो  घेऊ शकतात. 
 
आता एकंदरीत या अ‍ॅप मध्ये तीन फीचर्स - HDR mode, Night mode आणि Portrait mode आहे. सांगू इच्छितो की गूगल कॅमेरा गो अ‍ॅप कंपनीच्या गूगल कॅमेरा अ‍ॅपचे लाईट व्हर्जन अ‍ॅप आहे. हे अँड्रॉइडच्या गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये काम करतो. भारतात अँड्रॉइड गो वर काम करणारे काही स्मार्ट फोन्स  Infinix Smart HD, Samsung Galaxy M01 Core, Nokia 1, आणि Redmi Go आहे.