शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (10:22 IST)

मकर संक्रांती 2021 : शुभ काळ, वाहन आणि आपल्या मिळणारे फळ जाणून घ्या

पं. हेमन्त रिछारिया
वर्ष 2021 मध्ये मकर संक्रांतीचा सण कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात पारगमनाचे फार महत्त्व आहे. नवग्रहांत पारगमनाचे जातकाला मिळणाऱ्या फळात विशेष भूमिका बजावते. तसेच ग्रहाच्या पारगमन होण्याचा आधारावर अनेक मुहूर्त आणि ज्योतिषीय गणना निश्चित केल्या जातात. जसं की - त्रिबळ शुद्धी, साडेसाती आणि ढैय्या, मकर संक्रांती इत्यादी. 
 
ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांत सूर्याला राजा मानला आहे. सूर्याचा पारगमन अनेक ज्योतिषीय गणना आणि मुहूर्ताला ठरवितो. सूर्याच्या पारगमन ला संक्रांती म्हणतात. संक्रांती प्रत्येक महिन्यातच येते कारण सूर्याचे पारगमन दर महिन्यात होतात. सूर्याचे धनु आणि मीन राशीमध्ये पारगमन झाल्यामुळे खरमास किंवा 
 
मलमास चा प्रारंभ होतो. अशा प्रकारे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये पारगमन करत तेव्हा ह्याला 'मकर-संक्रांती' म्हणतात. मकर संक्रांती हिंदू धार्मिक लोकांसाठी महत्त्वाचा सण आहे.
 
सामान्यतः हा सण 14 जानेवारी ला साजरा केला जातो कारण या दिवशी सूर्याचे पारगमन धनु राशी मधून मकर राशीमध्ये होते. यंदाच्या नवीन वर्षात मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2021 ला साजरा केला जाणार आहे.. या दिवशी नवग्रहाचे राजा सूर्य आपली राशी बदलून सकाळी 8 वाजून 5 मिनिटावर मकर राशीमध्ये प्रवेश करतील. सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश करतातच जगभरात मकर संक्रांतीचा सण सुरू होईल.
 
* मकर संक्रांतीचा शुभ काळ -
यंदाच्या वर्षी 2021 मध्ये मकर-संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 8 वाजून 5 मिनिटांपासून सुरू होऊन रात्री 10 वाजून 46 मिनिटा पर्यंत आहे.
 
* संक्रांतीचे वाहन -
वर्ष 2021 मध्ये संक्रांतीचा वाहन सिंह(व्याघ्र) आणि उपवाहन गज(हत्ती)आहे. यंदाच्या वर्षात संक्रांतीचे आगमन श्वेत वस्त्र आणि पाटली कंचुकी धारण केलेले बाल्यावस्थेमध्ये कस्तुरी चे उटणे लावून गदा आयुध(शस्त्र) घेऊन स्वर्णपात्रेत अन्न खाताना आग्नेय दिशेकडे बघत पूर्वीकडे जात आहे.
 
* संक्रांतीचे फळ - 
देशभरात पांढऱ्या वस्तू  जसे की चांदी, तांदूळ, दूध, साखरेच्या किमती वाढतील. राजेबद्दलची विरोधाची भावना वाढेल. ब्राह्मण वर्गाचा सन्मान वाढेल. संत आणि शेतकरींना कष्ट होतील. पश्चिमेकडील देशांशी संबंधात गोडवा वाढेल. शेजारच्या देशाशी संबंधात कटुता वाढेल. साथीच्या रोगाचा प्रसार कमी होईल.
 
* मकर संक्रांतीचे राशीनुसार मिळणारे फळ -
1 मेष - इष्ट सिद्धी 
2 वृषभ - धर्म लाभ 
3 मिथुन - शारीरिक त्रास 
4 कर्क - सन्मानात वाढ 
5 सिंह - भीती आणि काळजी
6 कन्या - संपत्तीची वाढ
7 तूळ - कलह आणि मानसिक काळजी 
8 वृश्चिक - धनागमन आणि सुख शांती
9 धनु - धनलाभ
10 मकर - स्थिर लक्ष्मीची प्राप्ती 
11 कुंभ - लाभ 
12 मीन - प्रतिष्ठेमध्ये वाढ 
 
* स्नान आणि दान  
'मकर- संक्रांती' च्या दिवशी भाविकांना पवित्र नदीमध्ये वाटलेल्या तीळेचे उटणे लावून स्नान करावे आणि तिळाच्या बनलेल्या वस्तू, ब्लॅंकेट आणि कपडे दान करावे. हे असं करणं चांगले राहील.