शनिवार, 1 फेब्रुवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जानेवारी 2025 (08:45 IST)

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Makar Sankranti
कथा 1
पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या पुत्र शनीदेवाला भेटायला त्यांच्या घरी जातात. शनी मकर राशीचे देव आहे म्हणून ह्याला मकर संक्रांती देखील म्हणतात. 
 
कथा 2 
महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळाला होता. अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाची निवड केली होती. भीष्मांना माहित होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्युलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामहने आपले प्राण सोडले.
कथा 3  
धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भागीरथाच्या मागे-मागे मुनी कपिल ह्यांच्या आश्रमातून होत गंगासागर मध्ये पोहोचली. पृथ्वीवर अवतरण झाल्यावर राजा भागीरथ ह्यांनी गंगेच्या पावित्र्य पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते. या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते.
 
कथा 4 
आई यशोदाने अपत्यप्राप्तीसाठी याच दिवशी उपवास केला होता. या दिवशी स्त्रिया तीळ आणि गूळ इतर सवाष्णींना वाटतात. असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णू यांच्यापासून झाली होती. म्हणून ह्याचा वापर केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. तिळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहतं आणि शरीरात उष्णता राहते.