शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (07:54 IST)

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बदनामीकारक पोस्ट, महंत सुधीरदास विरोधात गुन्हा दाखल

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियात महंत सुधीरदास यांनी पोस्ट केल्यामुळे त्यांच्याविरोधात पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टवरुन  मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
महंत सुधीरदास यांनी  मराठा क्रांती मोर्चाच्या पोस्टरवरील नेतृत्व करणा-या मुलीचा फोटो सोशल मीडियात पोस्ट करत ‘ती सध्या काय करते ?’ अशा शब्दांत सोशल मीडियात पोस्ट व्हायरल केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यानंतर या प्रकरणात करण पंढरीनात गायकर यांनी तक्रार केली. त्यानंतर पंचवटी पोलीस स्थानकात  आयपीसी कलम ५०४ अंतर्गत बदनामीकारक पोस्ट आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.