Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणपती आरती संग्रह भाग 4

Updated: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (16:05 IST)
स्मरणें विघ्नवृंद वारी।तारि दुरितसागरी वसुदेवकरि परिवितार्थ अतिभक्ति गणपतीची॥
मंगला भक्ति गणपतीची॥आरती.॥३॥
 
****************************
ओंवाळू आर्ती देवा श्रीमंगलमूर्ती॥
अघसंकट नासुनियां द्यावी चरणांसी मुक्ती॥धॄ.॥जय॥
देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया।
तुझीया स्वरुपी न सरी पावे दुसरी उपमाया॥१॥
शेंदूर अंगी चर्चुन कंठी मुक्तांची माळा।
लंबोदर उंदीरवर शोभे लल्लाटी टीळा॥२॥
पीतांबर परिधान पायी घुंगुरध्वनि गाजे।
दुर्वांकुर वाहिले आम्ही भक्तीचे काजे॥३॥
वार्षिक उत्साहाची सेवा यथाशक्ति केली।
न्यूनाधिक तें क्षमा करुनि रक्षी माउली॥४॥
महानैवेद्य घृतशर्करा्मिश्रीत हे लाडू।
अर्पू तुजला प्रसाद आपुल्या पात्री तो वाढूं॥५॥
पिता तुझा तो सांब सदाशिव ध्यातो।
श्रीरामा हनुमंतानें त्याचे पायी धरिला सुप्रेमा॥६॥
 
**************************** 
जय जय गणपती। ओवाळीत आरती।
साजि-या सरळ भुजा। परश कमळ शोभती॥धृ.॥
अवतार नाम भेद। गणा आदी अगाध॥
जयासी पार नाही। पुढे खुंटला वाद॥
एकचि दंत शोभे। मुख विक्राळ दोंद॥
ब्रह्मांडा माजि दावी।ऐसे अनंत छंद॥ जय.॥१॥
हे महा ठेंगणी हो। तुज नृत्यनायका॥
भोंवरी फ़ेरे देता। असुरा मर्दीले एका॥
घातले तोडर हो। भक्त जनपाळका॥जय॥२॥
सुंदर शोभला हो। रुपे लोपली तेजें।
उपमा काय देऊं। नसे आणिक दुजे॥
रवि शशि तारांगणे। जयामाजी सहजे॥
उधरी सामावली। जया ब्रह्मांडबीजे॥जय.॥३॥
वर्णिता शेष लीला। मूखे भागली त्याची॥
पांगुळले वेद कैसे। चारी राहिले मुके॥
अवतार जन्मला हो। लिंग नामिया मुखे॥
अमूर्त मूर्तिमंत। होय भक्तीच्या सूखे॥ जय॥४॥
ऐसाचि भाव देई। तया नाचतां पुढे॥
धूप दीप पंचारती। ओवाळीन निवाडे॥
राखें तूं शरणांगता।तुका खेळतां लाडे॥ जय॥५॥
 
  
****************************  
पाश करि उत्पल शंख गदा। चक्रधान्याग्र ऋजा सुखदा॥
इक्षु धनु मातु लिंग सुसदा । हरी निजदंत कृतांतमंदा॥चाल॥
विराजे रत्‍नकलशशुंडा। दंड अतिप्रचंड, मंडित उदंड वरदित अखंड, किलब्रह्मांड मंडनाची॥ प्रभातंशंड खंडनाची॥१॥
आरती जगद्वंदनाची। उमाशिवसांबवंदनाची ॥धृ.॥
स्वयें जी भूषविणार जगा। वल्लभा दिव्यभव्यसुभगा॥
स्वहस्ती अमल- कमल विभगा। विहगगजवक्रहंस विहगा॥ चाल॥
भुजें परिरभणानुसरली। करुनि चपलता, परि न विकलता, तरुसि जशी लता वसंताची॥
सदा शीलता सुसंताची॥आर.॥२॥
प्रथम उत्पन्न विश्वकर्ता। प्रकृति रक्षूंना प्रलयिंहर्ता॥
गु्णगुण वेदशास्त्रपढता। सकलसिद्धयर्थ स्वार्थ्मर्ता॥चाल॥
असा विघ्नेश इश घ्यावा। अभय करणार, विभय भरणार,  सुकवि तरणार, सदैवाची॥
कुमति हरणार राघवाची॥ आरती.॥३॥
****************************
 
आरती त्रिपुरमर्दनाची। वृषभध्वजा उमेशाची ॥ धृ. ॥
 
वामांकिनी उमा बैसे। सव्यवेष्ठित विघ्नेशें ॥
नंदी भृंगी उभे सरसे। पहाती विचित्रशावेशें ॥ चाल ॥
नेत्री पहा पहा शंभा, चंद्र्सूर्य नमिती रात्रिंचर चरण भद्रक्रर,  असती शांतमूर्ति ज्याची। भॊळा वाणी असे साची ॥ १ ॥
 
वाणी देवि घरी वीणा। विधीकरि करताल निपुणा ॥
इंदिरा गान रचनपूर्णा। इंद्र पटू वेणुनाद करणा ॥ चाल ॥
धिमिधिमि मृदंगाचा। निशामुखी नाद सांद्र्पटु मंद हरि करींद्र सुंदरास्य ना केंद्र सर्व लक्षुनि सेविति, विधृति तांडवाची, शंभुला विधृती तांडवाची ॥ २ ॥
 
नंदी वाहन असें द्वारी। घेती दर्शन नरनारी ॥
नमितां त्रिविधताप सारी। सुरवर उमेश कामारी ॥ चाल ॥
बोरवेष्यिलासे गणे, बाण डमरूधर, भव्यगौरिहर, प्राशीजो जहर, शांती जो करि अमराची, नमितो तुजला गजाननजी ॥ ३ ॥
****************************
शंकरतनया भवभयहरणा पंचारती तुजला॥
करितों भावे विघ्नहरा हे तारी भक्तांला॥धृ.॥
प्रेमानंदे सर्व लोक स्मरती पदकमला॥
गिरिजांकी तू बैसूनि नाना दाखवसी लीला॥
अवतरलासी भक्तजनासी मुक्ती द्यायाला॥
विठ्ठसुत बलवत्वकवि ध्यातो भवाब्धि तरण्याला॥१॥
****************************

सर्व पहा

मोदकाचा आकार असाच का असतो? बाप्पाच्या आवडत्या नैवेद्यामागे आहे खास अर्थ

श्री कृष्ण जन्माष्टमीपूर्वी या शुभ वस्तू घरी आणा! लाडू गोपाळाचा आशीर्वाद मिळवा

Neem Karoli Baba Blanket नीम करोली बाबा नेहमी स्वतःला घोंगडीत का गुंडाळून ठेवत असत?

Hanuman 108 Names : मंगळवारी मारुतीचे १०८ नावांचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख