suvichar

॥ श्री रामाची आरती ॥

बुधवार, 21 एप्रिल 2021 (11:14 IST)
त्रिभुवनमंडितमाळ गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥
 
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
 
ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।
मारुती सन्मुख उभा कर जोडून॥
 
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
 
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥
 
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
 
रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥
 
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
 
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥
 
श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

सर्व पहा

आज श्री ताप्ती जयंती, महत्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या

दत्तदशक स्तोत्र | Datta Dashak Stotra श्री दत्तात्रेयांची कृपा, संरक्षण आणि मनोकामना पूर्ण करणारे प्रभावी स्तोत्र

शिव रक्षा स्तोत्र : भगवान शिवाची कृपा, संरक्षण आणि संकटांपासून मुक्ती देणारे प्रभावी स्तोत्र

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments