1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (13:57 IST)

श्री गणेश जयंती विशेष : सर्वात पहीला मान तुमचा

देवबाप्पा आज म्हणे तुमचा वाढदिवस,
तिळगुळाचे लाडू, म्हणून केले हो खास,
ह्यावर्षी दरवर्षी सारखी गर्दी नाही हो करणार,
देवळात लांबच्या लांब रांगा नाहीत लागणार,
करा तुम्ही तुमचा वाढदिवस तसा शांततेत,
पुढल्या वर्षीचे आतापासूनच आखू नका बेत,
लाल फुल अन लाडू वरच माना यंदा समाधान,
घरीचं आरती करू, अन तुमचा करू मानपान,
तरी पण आजचे महत्त्व नाही हो कमी होणार,
सर्वात पहीला मान तुमचा, सदैव लक्ष्यात ठेवणार!! 
अश्विनी थत्ते