मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (17:05 IST)

Anant chaturdashi 2020 : श्रीकृष्णाने सांगितले होते अनंत चतुर्दशीचे महत्त्व...

अनिरुद्ध जोशी
अनंत चतुर्दशी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात येते. 'डोल ग्यारस किंवा 'डोल एकादशीच्या अनंत चतुर्दशी आणि त्यानंतर पौर्णिमा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता होते. या दिवशी गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. यंदाच्या वर्षी ही तिथी 1सप्टेंबर 2020 ला येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाने पांडवांना या दिवशी उपवास करणे आणि अनंताची पूजा करण्याचे महत्त्व सांगितले असे.
 
श्रीकृष्णाने सांगितले होते त्याचे महत्त्व : पांडवांनी द्यूतक्रीडेत आपले सर्व राज्य गमावल्यावर त्यांनी श्रीकृष्णाला विचारले की काय करावं की गेलेले सर्व राज्य परत मिळेल आणि या सर्व त्रासापासून सुटका मिळेल या साठीचे उपाय सांगावे. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना परिवारासह अनंत चतुर्दशीचे उपवास करण्यास सांगितले.
 
ते म्हणाले की चातुर्मासात भगवान विष्णू शेषनागाच्या शैयावर अनंत शयनात राहतात. अनंत भगवानाने वामन अवतारात दोन पावलातच तिन्ही लोक मापले होते. याचा आरंभ किंवा शेवटचे काहीच माहीत नाही, म्हणूनच त्यांना अनंत देखील म्हटले जाते म्हणून त्याचा पूजेने आपले सर्व त्रास संपतील.
 
हे ऐकून युधिष्ठिर ने आपल्या परिवारासमवेत या दिवशी उपवास ठेवून भगवान विष्णूची विधिविधानाने पूजा केली, ज्यामुळे त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले.
 
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान अनंताची (विष्णू)पूजा केली जाते. या दिवशी अनंत सूत्र बांधण्याचे विशेष महत्त्व आहे. या उपवासात भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केल्यावर हाताला अनंत सूत्र बांधले जाते. भगवान विष्णूंचे सेवक भगवान शेषनागाचे नाव अनंत असे. अग्नी पुराणात अनंत चतुर्दशी उपवासाच्या महत्त्वाचे वर्णन केले आहे.