गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (15:39 IST)

कोरोना काळात गणेशाचे विसर्जन कसं करावं, सोपी प्रामाणिक पद्धत जाणून घेऊ या...

गणेश उत्सव आपल्या देशातील एक महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला घरात घरात गणपतीची पूजा आणि स्थापना केली जाते त्या नंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते.
 
आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रहदारीवर आळा घातला गेला आहे. सर्व काही मर्यादित आणि प्रतिबंधित आहे, तर आम्ही आपल्या वेबदुनियेच्या पाठकांसाठी घेऊन आलो आहोत गणेश विसर्जन पूजेची एक संपूर्ण सोपी पद्धत ज्याचा द्वारे ते गणेश मूर्तीचे विधिविधानाने पूजा करू शकतील.
 
पूजेचे साहित्य : गणपती (माती, सोनं, चांदी ,पितळ, पारा), हळद, कुंकू, अक्षता (तांदूळ), सुपारी, शेंदूर, गुलाल, अष्टगंध, जानवी जोड, कापडी, माउली (मोली) लवंगाची मूर्ती. वेलची, नागलीचे पान, दूर्वा, पंजिरी, पंचामृत, गायीचे दूध, दही, मध, गायीचे तूप, साखर, गूळ, मोदक, फळे, नर्मदाचे पाणी / गंगेचेपाणी, फुल, हार, कलश, सर्वोषधी, आंब्याचे डहाळी, केळीचे पान, गुलाबजल, अत्तर, धुपकांडी, निरांजन-वाती, नाणी, नारळ.
 
पूर्णपूजेची विधी : अनंत चतुर्दशीच्या दिवशी, शुभ अश्या मुहूर्तावर वरील दिलेल्या सर्व साहित्याची व्यवस्था करावी आणि आपल्या देवघरात एकत्रित करावं. पूजा करीत असताना आपला चेहरा उत्तर किंवा पूर्वीकडे असावा. तुपाचा दिवा लावावा.
 
पावित्र्यात : कोणतीही पूजा करण्यापूर्वी शुद्ध आणि पावित्र्य असणे महत्त्वाचे आहे. शुद्धीकरणासाठी, आपल्या डावी कडे पाणी घ्या, त्याला उजव्या हाताने झाका आणि खालील मंत्राने आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण पूजेच्या साहित्यावर शिंपडावं.
 
मंत्र- ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि व।
य: स्मरेत पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यान्तर शुचि।।
आता आचमन करून पुढील मंत्र तीन वेळा म्हणून आचमन करावं  
ॐ केशवाय नम:
ॐ नारायणाय नम:
ॐ माधवाय नम:
आता पळी भर पाणी हातावरून ताम्हणात सोडत "ॐ गोविंदाय नमो नम:" तीन वेळा "पुंडरीकाक्षं पुनातु:" म्हणून हात धुवावे. हात धुतल्यावर आपल्या त्वचेवर कुंकू किंवा चंदनाने टिळा लावावा.
 
दिव्याची पूजा :
दिव्याची पूजा करण्यासाठी, एका फुलात हळद, कुंकू, शेंदूर आणि एकफुलामध्ये अष्टगंध टाकून पुढील मंत्राने दिवासमोर ठेवावं
"शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखसम्पदाम्।
शत्रुबुद्धिविनाशाय च दीपज्योतिर्नमोऽस्तुते।
दीपो ज्योति: परब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं दीप ज्योति नमोऽस्तुते॥
 
संकल्प : संकल्प घेण्यासाठी आपल्या डाव्या हातात फुल, अक्षता, सुपारी आणि नाणं घेऊन आचमन करून संकल्प म्हणा -ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णु: श्रीमदभगवतो महापुरूषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मणोऽह्रि द्वितीयपरार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वत्मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भारतवर्षे आर्यावर्तैकदेशे “अमुक”(इथे अमुकच्या ठिकाणी आपल्या शहराचा उच्चार करावा) नगरे/ ग्राम2077 वैक्रमाब्दे प्रमादी नाव संवत्सरे भाद्रपद मासे शुक्लपक्षे, चतुर्दशी तिथौ अमुकवासरे प्रात:/अपरान्ह/मध्यान्ह/सायंकाले “अमुक”(इथे अमुक च्या स्थानी आपल्या गोत्राचे उच्चार करावं )गोत्र ...शर्मा /वर्मा/ गुप्त: श्री गणपती देवता  प्रीत्यर्थं विसर्जन पूजनं कर्म अहं करिष्ये.
 
असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावं. सर्व हातातील साहित्य गणेशाच्या समोर त्यांचा चरणी वाहून द्या आणि एक पळी पाणी घेऊन संकल्प सोडा.
ध्यान - गणपतीचे स्मरणं करून आपल्या उजव्या हातात फुल घेऊन दोन्ही हात जोडून पुढील मंत्र म्हणा आणि गणपतीच्या समोर अर्पित करावे-
"गजानन भूतगणादिसेवतं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्।
उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपंकजम्॥
 
गौरीचे ध्यान करण्यासाठी आपल्या डाव्या हातात अक्षता घेऊन त्यात हळद टाका नंतर त्या पिवळ्या अक्षतांपैकी एक एक अक्षता आपल्या उजव्या हाताने उचलून गणपतीच्या समोर पुढील मंत्रासह उच्चार करून गणपतीच्या पुढे अर्पण करावं-
 1. श्रीमन्महागणाधिपतये नम:
2. लक्ष्मीनारायणाभ्यां नम:
3. उमा-महेश्वराभ्यां नम:
4. वाणीहिरण्यगर्भाभ्यां नम:
5. शचीपुरन्दाराभ्यां नम:
6. मातृपितृचरणकमेलेभ्यो नम:
7. इष्टदेवताभ्यो नम:
8. कुलदेवताभ्यो नम:
9. ग्रामदेवताभ्यो नम:
10. वास्तुदेवताभ्यो नम:
11. स्थानदेवताभ्यो नम:
12. सर्वेभ्यो देवेभ्यो नम:
13. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम:
14. ॐ सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नम:
 
पद्य पूजा –
श्री गणेश आणि गौरीचे पाय धुण्यासाठी श्री गणेश आणि गौरीं समोर एक पळी पाणी सोडावं.
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, पाद्यं अर्घ्यं समर्पयामि समर्पयामि"
शुद्ध पाण्याने अंघोळ  -
सर्वात आधी गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालावे-
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, शुद्धोदकस्नानं समर्पयामि "
दुधाने अंघोळ -
गणपतीच्या प्रतिमेस  एका ताटलीत ठेवून पुढील मंत्र म्हणून गणपतीला गायीच्या दुधाने अंघोळ घाला.
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, पय:स्नानं समर्पयामि
दह्याने अंघोळ-
दुधाने स्नान अंघोळ घातल्यावर गणपतीला दह्याने अंघोळ घालावी.
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, दधिस्नानं समर्पयामि"
तुपाने अंघोळ-
दह्याने अंघोळ घातल्यावर गणपतीला तुपाने अंघोळ घालावी.
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, घृतस्नानं समर्पयामि
मधाने अंघोळ-
तुपाने अंघोळ घातल्यावर गणपतीला मधाने अंघोळ घालावी.
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, मध स्नानं समर्पयामि।"
साखरेने अंघोळ-
मधाने अंघोळ घातल्यावर गणपतीला साखरेने अंघोळ घालावी.
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, शर्करास्नानं समर्पयामि"
पंचामृताने अंघोळ-
साखरेने अंघोळ घातल्यावर गणपतीला पंचामृताने अंघोळ घालावी.
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, पंचामृतस्नानं समर्पयामि"
स्वच्छ पाण्याने अंघोळ -
पंचामृताने अंघोळ घातल्यावर गणपतीला स्वच्छ पाण्याने अंघोळ घालावी.
मंत्र- "ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, शुद्धोदकस्नानं समर्पयामि"
आता पुढील मंत्र म्हणून आचमन करीत एक पळीपाणी ताम्हणात गणपती समोर सोडावं.
"शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं जलं समर्पयामि"
कापडी आणि जानवी जोड -
स्वच्छ पाण्याने अंघोळ घातल्यावर गणपतीला वस्त्र, कापसाचे वस्त्र, दागिने आणि जानवी जोड घालावे.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, वस्त्रं समर्पयामि "
चंदन -
सुशोभित केल्यावर गणपतीला चंदन आणि शेंदूर लावावे.
मंत्र-"श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम्"
विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृहताम्
"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, चन्दानुलेपनं समर्पयामि "
पंचोपचार -
गणपतीला अक्षत, शेंदूर, गुलाल,बुक्का इत्यादीने पंचोपचार पूजा करावी.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि "
फुले आणि माळ -
आता गणपतीला फुलांची माळ किंवा हार घालावे.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:,पुष्पमालां समर्पयामि"
दुर्वा-
आता गणपतीला दूर्वा द्याव्या.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:,दूर्वांकुरान समर्पयामि"
अत्तर-
आता गणपतीला अत्तर लावावे.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, सुगन्धिद्रव्यं समर्पयामि"
धूप -
आता गणपतीला धुपाचा कांडीचा वास द्यावा.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, धूपमघ्रापयामि समर्पयामि"
दीप -
आता गणपतीला निरंजन ओवाळावी.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, दीपं समर्पयामि"
आता हात स्वच्छ धुवून घ्या.आणि गणपतीला नैवद्य (दुर्वा,गुळ आणि मोदक)दाखवावे.
ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा,ॐ व्यानाय स्वाहा, ॐ अमृतापिधानमसि स्वाहा
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, नैवेद्यं निवेदयामि "
फळ -
नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपतीला फळ द्यावे.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, ऋतुफलानि निवेदयामि"
तांबूल(विड्याचे पान)-
गणपतीला लवंग-वेलची ठेवून तांबूल द्यावा.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, मुखवासार्थम् एलालवंग-पूंगीफल्सहितं ताम्बूलं समर्पयामि "
दक्षिणा-
आता गणपतीला श्रीफळ आणि यथाशक्ती दक्षिणा द्यावे.
मंत्र-"ॐ भूर्भुव:स्व: गणेशाम्बिकाभ्यां नम:, कृताया: पूजाया: द्रव्यदक्षिणां समर्पयामि"
आरती-
आता गणपतीची आरती करावी.
क्षमा प्रथांना-
आता हातात फुलेआणि अक्षता घेऊन काहीही झालेल्या चुकांसाठी ची क्षमा प्रार्थना करावी.
मंत्र-गणेशपूजनं कर्म यन्यूनमधिकं कृतम्
तेन सर्वेण सर्वात्मा प्रसन्नोऽतु सदा मम"
वरील मंत्र म्हणून हातात घेतलेले फुलं आणि अक्षता गणपतीला अर्पण करावं आणि गणेशाला प्रार्थना करून नमस्कार करावा.
एक पळी पाणी आचमन करून आपल्या आसनावर सोडून डोळ्याला पाणी लावून पूजेची सांगता करावी.
विसर्जन-
विसर्जनासाठी आपल्या हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणून श्री गणेशाच्या समोर अर्पण करावं आणि गणपतीच्या मूर्तीला हालवावे, नंतर आपल्या सोयी प्रमाणे कोणत्या नदीत, विहिरीत, तळ्यात विसर्जित करावं.
 श्री गणेश विसर्जन मंत्र
 गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च.
 ॐ गं गाणपत्ये नम:,ॐ गं गाणपत्ये नम:,ॐ गं गाणपत्ये नम:
 -ज्योतिर्विद् पं. हेमन्त रिछारिया