संबंधित माहिती
- नारदकृत - संकटनाशन स्तोत्रात उल्लेखित बारा नावे व त्यांची सद्यस्थाने
- आपणांस गणेशाच्या स्त्री स्वरूपाची माहिती आहे का? जाणून घ्या..
- दगडूशेठ गणपती ट्रस्ट श्रीं चे विसर्जन मुख्य मंदिरातच करणार
- Ganesh Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष
- श्रीगणेश चतुर्थी 2020 : 10 दिवसात गणेशाच्या या 11 उपायांपैकी कोणते ही 1 उपाय करा..
बाप्पा घरी आले, अवघे घर देऊळ झाले
बाप्पा घरी आले, अवघे घर देऊळ झाले,
टाळ्या आरत्या ने, घर निनादू न गेले,
फुलांचा सुवास दरवळला आसमंतात,
नैवेद्य रूपाने झाले गोड धोड ही घरात,
लगबग बाप्पा सारी तुझ्याच भोवती रे,
तू आलास की आंनदास उधाण येतंय रे,
आज तुला निरोप द्यायची इच्छा नाही मज,
होते पापणी ओली,येतो हुंदका हुळूच सहज,
जड अंतकरणाने देईन निरोप आज तुजला,
पुढच्या वर्षी येण्याचे दे वचन तू सकळा,
तो पर्यंत हे सावट ही होईल नाहीसे,
लवकरच संकटाचे काळे ढग,होतील दिसे नासे !!
...अश्विनी थत्ते
