आपणांस गणेशाच्या स्त्री स्वरूपाची माहिती आहे का? जाणून घ्या..
गणेश एकदा स्त्री बनले होते, गणेशाचे स्त्री रूप प्रगट झाले होते की विनायकी नावाची एखादी देवी स्त्री वेषात गणेशा सारखी दिसणारी होती. अखेर गणेशाच्या स्त्री रूपाचे गूढ काय आहेत ? चला जाणून घेऊ या.
पौराणिक कथेनुसार एकदा अंधक नावाचा राक्षस आई पार्वती वर आसक्त होऊन त्यांना बळजबरीने धरण्याचा प्रयत्न करू लागत असताना देवीने भगवान शिवाला विनवणी केली. शिवाने आपल्या त्रिशूळाने त्याला ठार मारले पण त्याचा मायावी सामर्थ्यामुळे त्याचा रक्ताचे थेंब जमिनीवर पडल्यावर प्रत्येक थेंबा पासून एक राक्षसी 'अंधका' जन्मली. म्हणजे हे रक्ताचे थेंब देखील एका प्रकारच्या राक्षसाप्रमाणे होते, या रक्ताची थेंब जमिनीवर पडल्या वर ती राक्षसी अंधका बनायची.
अश्या परिस्थितीत महादेवासमोर एक समस्या उद्भवली की आता काय करावं ? आता एकच मार्ग आहे की रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडायला नको. तेव्हाच ती राक्षसी ठार होणार. अशा परिस्थितीत पार्वतीने विचार केले की प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषात एक स्त्रीच असते. तेव्हा त्यांनी सर्व देवतांना बोलवले ज्यामुळे सर्व देवांनी आपल्या स्त्रीच्या स्वरूपाला पृथ्वीवर पाठविले जेणे करून जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला ते पिऊन घेतील. इंद्रा पासून इंद्राणी, ब्र्हमापासून ब्राह्मणी, विष्णू पासून वैष्णवी शक्ती पृथ्वीवर पाठवली.
अश्या प्रकारे सर्व देवांनी आपली आपली शक्ती पाठवली. त्याच प्रकारे गणेश ज्यांचे नाव विनायक होते त्यांनी विनायकीला पाठविले. अश्या प्रकारे त्या राक्षसांचे अंत झाले. असे ही म्हटले जाते की देवी पार्वतीनेच सर्व देवींना बोलविले होते.
परंतु असे ही म्हटले जाते की विनायकी नावाची ही देवी कदाचित आई पार्वतीची मैत्रीण मालिनी देखील असू शकतात ज्याचा चेहरा देखील गज सारखा होता. पुराणात मालिनीचा उल्लेख गणेशाचा सांभाळ करणाऱ्या आया म्हणून मिळतो.
संदर्भ : दुर्गा उपनिषद, मत्स्य पुराण आणि विष्णू धर्मोत्तर पुराण.