गणपतीची पूजा दूर्वा शिवाय अपूर्ण आहे जाणून घेऊ या याचे महत्त्व....

ganapati
Last Modified शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (16:19 IST)
येता 22 ऑगस्ट, शनिवारी रोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला पहिले पूज्य आराध्य देव गणेशाचे जन्मोत्सव गणेश चतुर्थीच्या रूपात साजरे केले जाणार आहे. हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरे केला जातो आणि घरा-घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. सर्व भाविक पूजा करून गणपतीला प्रसन्न करण्यासाठीची इच्छा बाळगतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी पूजेत दुर्वा समाविष्ट करावी. जी भगवान गणेशाला खूप आवडते. चला तर मग जाणून घेउ या गणपतीच्या पूजेमध्ये दूर्वा गवताचे काय महत्त्व आहे आणि त्याशिवाय पूजेची पूर्णता का होत नाही.
भगवान गणपतीला 21 दूर्वांची जुडी अर्पण करावी.
गणपती पूजेत विनायकाला 21 वेळा 21 दूर्वांची जुडी अर्पण करावी. या मुळे ते लवकर प्रसन्न होतात आणि भाविकांची सर्व इच्छा पूर्ण करतात. दूर्वांशिवाय भगवान गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. वास्तविक, या मागील एक कथा आहे की अखेर भगवान गणेशाला दूर्वा

का आवडते. कथेनुसार, एकदा अनलासूर नावाचा राक्षस होता, तो साधू संतांना खाऊन टाकायचा. त्याचा उद्रेक झाल्याने सर्वत्र हाहाकार माजला. सर्वांनी मिळून गणेशाकडे विनवणी केली आणि अनलासुराबद्दल सांगितले.
गणेशाची जळजळ कमी झाली
गणेशजी अनलासूर जवळ गेले आणि त्याला गिळून घेतले. या नंतर त्यांना त्रास होऊ लागला आणि पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा कश्यप ऋषींनी त्या जळजळला शांत करण्यासाठी गणपतीला 21 दूर्वा खाण्यासाठी दिल्या. यामुळे त्यांची जळजळ शांत झाली. तेव्हापासूनच असे मानले जाते की दूर्वांकुर अर्पण केल्याने गणपती लवकरच प्रसन्न होतात.

गणेशाने घेतले ब्राह्मण देवतांचे रूप
या व्यतिरिक्त गणेश पुराणात दुर्वाला घेऊन आणखीन एक कथा सांगितली जाते. कथेनुसार, नारदजी भगवान गणेशाला महाराज जनक यांचा अभिमानाबद्दल सांगतात आणि म्हणतात की ते स्वतःला तिन्ही जगाचे स्वामी म्हणून वावरतात. या नंतर गणेशजी एका ब्राह्मणाचे वेष धरून मिथिला नरेशाकडे त्यांचा गर्व हरण करण्यासाठी गेले. तेव्हा ब्राह्मण म्हणतात की ते इथवर राजाच्या गौरव ऐकून आले आहे आणि बऱ्याच दिवसापासून उपाशी आहे. मग राजा जनकाने आपल्या सेवकांना ब्राह्मण देवतांना अन्न देण्यास सांगितले.
अश्या प्रकारे गणेशाची भूक शांत झाली.
तेव्हा गणेशाजीने पूर्ण शहरातील अन्न खाऊन टाकले तरीही त्यांची भूक शांत झाली नाही. राजाला हे कळता क्षणी त्यांनी आपल्या गर्वाबद्दल गणेशाकडे माफी मागितली. मग ब्राह्मणरूप घेतलेले गणेश गरीब ब्राह्मण त्रिशिरसाच्या दारी जाऊन पोहोचतात. जिथे त्यांना ब्राह्मण त्रिशिरसची बायको विरोचना ने जेवण्याच्या पूर्वी गणेशाला दूर्वांकुर अर्पण केले. ते खाल्ल्यावर त्यांची भूक शांत झाली आणि ते पूर्णपणे समाधानी झाले. या नंतर गणेशाने दोघांना मोक्षाचे आशीर्वाद दिले. तेव्हा पासून गणेशाला दूर्वांकुर आवर्जून अर्पण करतात. याला अर्पण करून, पार्वतीच्या मुलाची कृपा त्वरित भाविकांना मिळते.
गणेश पुराणात आणखी कथा आहेत.
गणेश पुराणात दूर्वांकुराच्या महत्त्वाविषयी आणखी एक आख्यायिका आहे. या दंतकथेनुसार, कौंडिण्य यांचा पत्नी आश्रयाने जेव्हा गणपती महाराजांना दूर्वांकुर अर्पित केले तेव्हा कुबेराचा संपूर्ण खजिना देखील त्याची बरोबरी करू शकले नाही. शास्त्रात दुर्वांकुराचे आश्चर्यकारक महत्त्व सांगितले आहे. याच कारणास्तव शतकानुशतके भगवान गणेशाला दूर्वांकुर अर्पण करण्याची परंपरा चालत आली आहे. गणेश पुराणानुसार, एकदा एक चांडाळ आणि एक गाढव देऊळात जातात आणि काही असे करतात की त्यांचा हातून दूर्वांकुर गणपतीवर पडते. गणपती यामुळे फार आनंदी होतात आणि दोघांना आपल्या लोकांमध्ये उच्च स्थान देतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रावणात काय खरेदी करावं जाणून घ्या

श्रावणात काय खरेदी करावं जाणून घ्या
श्रावण महिन्याचा पहिला दिवस खूप खास, या 10 गोष्टींपैकी एक आणा, प्रत्येक कामात यश ...

कामिका एकादशी : पापांपासून मुक्त होण्याचा मार्ग

कामिका एकादशी : पापांपासून मुक्त होण्याचा मार्ग
गंगा, काशी, नैमिशरण्य आणि पुष्करमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूची पूजा ...

कहाणी सोमवारची

कहाणी सोमवारची
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला चार बायका होत्या. राजानं एकेकीला एकेक काम वाटून ...

प्रदक्षिणा आरती

प्रदक्षिणा आरती
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो ...

गणपती स्तोत्र मध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष

गणपती स्तोत्र मध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने
१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ २. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये ...

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...