सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (20:59 IST)

गणेशोत्सव आणि आम्ही

आम्ही शाळेत होतो तेंव्हा "गणपती" कॉलोनी मध्ये बसवीत असे, कोण आनंद, उत्साह अंगात संचारत असे. मोठ्या थाटामाटात स्वागत मिरवणूक काढून होत असे, त्यानंतर स्थापना आरती होत असे.
शाळेतून आल्यावर होमवर्क पटकन आटोपून आमचा मुक्काम  ग्राउंड वर असायचा. गणपतीची भक्तीपर गाणी संध्याकाळी सहा पासूनच लागायची.
कार्यक्रम पण असायचे, संस्कृती क कार्यक्रम, जादू चे प्रयोग, गाणी आणि सगळ्यात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे "सिनेमा"!!
मोठा पडदा लावून त्यावर सिनेमा लावायचे, आणि कोणता सिनेमा आहे ह्याचं प्रचंड आकर्षण असायचे. आजूबाजूला बाकी कॉलोनी मध्ये पण सिनेमा असायचा.लक्ष तिकडे ही असायचं आमचं.
आम्ही बसायला म्हणून पोत वगैरे घेऊन खूपच आवडीने जायचोच.
एकदा थोड्या दूरवरच्या ग्राउंड वर सिनेमा होता, मी आणि माझ्या पेक्षा मोठा भाऊ, घरी न सांगता पोत वगैरे घेऊन गेलो तिथं.
मी 3/4 असेन, सिनेमा बघता बघता केव्हा त्या पोत्यावर झोपी गेलो हे समजलेच नाही. तो ही झोपला, अन मी ही झोपले. साधारण रात्री 10 च्या सुमारास बाबा आम्हास शोधत तेथे आले, आम्ही दोघे पाय दुमडून एका पोत्यावर झोपलो होतो. परीणाम जो व्हायचा तो झालाच! तडी पडली पण त्यानंतर मात्र मी कधीही सिनेमा बघायला गेली नाही.
विविध स्पर्धा, आनंद मेळावा असेही कार्यक्रम होत असे, अशारितीने दहा दिवसांची धामधूम आटोपून "बाप्पा"वाजत गाजत आमचा निरोप घेई.
वाईट वाटत असे, ग्राऊंडवर सुनसान वाटतं असे, पण नंतर येणाऱ्या "शा रदोत्सव"ची वाट बघत आम्ही मनाला समजवत असू!! 
..आजही आठवणी ताज्या आहेत,पुन्हा ते क्षण जगावेसे वाटतात!!
......अश्विनी थत्ते