Marathi Biodata Maker
✕

साप्ताहिक राशीफल 9 ते 15 सप्टेंबर 2018

Updated: शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (16:25 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये; अन्यथा भावी काळाच्या दृष्टीने मनस्ताप संभवतो. स्पर्धा परीक्षेत परिश्रम वाढविले तरच यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. सर्वत्र ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे वाटचाल करणे.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक क्षेत्रामधील मतभेद व संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. क्रीडा क्षेत्रात संघर्ष करूनच यश मिळवावे लागेल. सहकारी वर्ग अपेक्षित सहकार्य करण्यास असर्मथ राहील. अंतिम चरणात संततीबाबत काळजी निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक स्थिती अस्थिर राहील. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात संघर्ष निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात कार्यसभोवतालीन परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे इतरांबरोबर असणारे वाद अधिक वाढू शकतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे विविध कारणास्तव स्थगितीच्या मार्गावर राहतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीतच राहू शकतील. अंतिम चरणात परिस्थिती सुधारेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकेल. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात कामगिरी चांगली राहील. बक्षीस व मानसन्मान मिळून उत्साह वाढीस लागू शकेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे सावट व दडपण राहील. काही बाबतीत मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. परिस्थिती अनुकूल राहील. अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सहसा सामना करावा लागणार नाही. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेमधून बाहेर येतील व भावी काळाच्या दृष्टीने आर्थिक अडचणी मिटतील.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे अहितकारक ठरू शकेल व भावी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनावरील दडपण व काळजीचे सावट मिटण्याच्या मार्गावर राहील व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक टंचाई मिटेल व आर्थिक स्थिती मजबुतीच्या शिखरावर राहील; परंतु काही प्रमाणात अचानक खर्चाच्या प्रसंगास समोर जावे लागेल, विशेष करून पारिवारिक व मित्रमंडळीच्या संदर्भात खर्च करणे आवश्यक स्वरूपाचे ठरेल. अंतिम चरणात इतरांना मदत करावी लागेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास दगदग व त्रास वाढविणारा ठरू शकेल. 
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग अगर व्यवसाय, नोकरी आदी क्षेत्रातील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे उचित ठरू शकेल व होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता मिटेल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे या सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. हातात पैसा खेळताच राहील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात प्रवास मार्गात दगदग व त्रास वाढेल. इतरांबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. सहकारी वर्गाबरोबर असणारे वाद अधिक वाढवू नयेत, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. अंतिम चरणात व्यावसायिक प्रगती समाधानकारक राहील व वरिष्ठांबरोबर संबंध सुरळीत राहतील व मतभेद होणार नाहीत. मनोनुकूल व इच्छित स्थळी बदली योग जुळून येतील.

सर्व पहा

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

पांडे गावचे 'उभ्याचे नवरात्र': ३५० वर्षांची अतिशय खडतर आणि अद्वितीय धार्मिक परंपरा

विजयादशमी २०२६: दसऱ्याचे १० महत्त्वाचे पैलू आणि सणाचे अनोखे महत्त्व

शुक्र ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करावयाचे सोपे आणि प्रभावी उपाय

तोंडाला चव आणणाऱ्या उपवासाच्या भाज्या Vrat Special Vegetable Recipes

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments