ganesh chaturthi
✕

साप्ताहिक राशीफल 1 ते 7 सप्टेंबर 2019

Updated: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (16:57 IST)
 
कर्क - गुरू, शुक्र, रवी, बुध यांची साथ मिळाल्याने यशाचा मार्ग सुलभ होईल. प्रवास कराल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. आपली प्रतिमा चांगली ठेवता येईल. कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवाल. खर्च वाढला तरी आवकही ठीक राहील. व्ययस्थानी शनी - मंगळ आपल्या योजनांमध्ये अडथळे आणू शकतात. स्पर्धा, साहस या गोष्टींपासून दूर राहा. काही चांगल्या घटना घडतील. गणपती उत्सवाच्या काळात नवे उपक्रम सुरू करता येतील.  
 
सिंह - कायदा व अधिकार यांच्या कचाट्यात सापडू नका. विचाराने वागा. शनी साडेसाती, त्यात मंगळ, अष्टमात गुरू व व्ययस्थानी रवी - बुध अशा प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या मोठ्या अपेक्षा करणे योग्य होणार नाही. नवीन समस्या, आव्हाने यांना आमंत्रण मिळते, पण या गोष्टीत चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. 
 
कन्या - शनी - मंगळ सहयोगातील दूषित परिणामातून बाहेर पडण्यासाठी अथक प्रयत्नांची, हुशारीची जोड द्या. गणेशाची उपासना उपयोगी पडेल. काही महत्त्वाच्या समस्या सोडविणे शक्य होईल. आपल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळू शकेल. सामाजिक स्तर उंचावेल. चर्चासत्र, बैठकी, जनसंपर्क, व्यापारी उलाढाली या गोष्टींचा चांगला लाभ घेता येईल. 

तूळ - प्रवास कराल . मात्र नको त्या प्रलोभनांना बळी पडू नका. घरगुती वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. रवी - बुध, गुरू यांचे उत्तम सहकार्य मिळाल्याने आपल्या परिश्रमाचे, मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद व समाधान मिळू शकेल. गणेशोत्सवाचा आनंद घ्याल, व नवे उपक्रम राबविणे शक्य होईल. शनी - मंगळ सहयोगाची प्रखरता जाणवणार नाही. लहानसहान मिळणाऱ्या संधीचा लाभ घेऊन त्वरित कृती अंमलात आणणे अधिक लाभदायक ठरू शकते.
 
वृश्चिक - कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही व प्रकृतीस्वास्थ्यावर पडसाद पडणार नाहीत यावर लक्ष ठेवा. रवी, बुध, शुक्र, गुरू अशा बलवान ग्रहांची साथ मिळाल्याने आपला यशाचा मार्ग अधिक वेगवान होईल. पण चतुर्थातील शनी - मंगळ सहयोग यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करील . पण नाउमेद न होता कार्यक्षेत्रात बदल करू नका. 
 
धनू - अर्थप्राप्तीचा वेग वाढेल्याने समाधान होईल.आपल्या व्यवहारचातुर्याचे कौतुक होईल. शनी - मंगळाचा सहयोग संशयास्पद होऊ शकतो पण शुक्राची साथ मिळाल्याने नाराजी राहणार नाही. आपले दैनंदिन व्यवहार, उपक्रम चालू राहू शकतील. कार्यसाध्यासाठी गोड बोलून यश पदरात पडण्याचे धोरण हितकारक राहील. पैशाची आवक ठीक राहील.
 
मकर - दशमातील शनी - मंगळ संशयाचे वातावरण करू शकतो पण विचलित होऊ नका. पुढे जात राहा. पंचमात गुरू, सप्तमात शुक्र, भाग्यात रवी - बुध, दशमात राहू यांच्या उत्तम प्रतिसादामुळे मकर व्यक्ती विविध क्षेत्रांत आपला प्रभाव कार्यक्षेत्रात पाडू शकतील. शिक्षण, कला, साहित्य, व्यापार, नोकरी अशा विविध गोष्टींचा यात समावेश होऊ शकेल. 
 
कुंभ - प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. व्यवसायात प्राप्त परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. आपल्या सहकारीवर्गाचे मार्गदर्शन उपकारक ठरेल. प्रियव्यक्तिचा विश्वास संपादन कराल. मंगळ सहयोग आपल्या कार्यक्षेत्रात अनेक प्रकारचे वादग्रस्त प्रसंग, प्रश्न निर्माण करू शकतो. 
 
मीन -  गुरूकृपा व शुक्राची साथ मिळाल्याने पुष्कळसे प्रश्न सोडविता येतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. गणेशोत्सवाचा आनंद घ्याल. प्रकृतीची पथ्ये मात्र पाळा. आपल्या मनातील शंकाचे वेळीच निराकरण करा. अनपेक्षीत खर्चाचे प्रसंग येतील. कुटुंबियांच्या मताचा विचार करा. मंगळचा सहयोगाचा प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा राहणारा राहील, त्यामुळे त्याची चिंता करू नका.

सर्व पहा

Happy Navratri 2026 Wishes Images नवरात्र शुभेच्छा इमेजेस

श्राद्धपक्ष 2026: तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण करू शकला नाहीत तर काय होते?

शारदीय नवरात्र २०२६: घटस्थापना मुहूर्त, तिथी आणि संपूर्ण पूजा विधी

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील द्वादशी तिथीचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments