सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:38 IST)

कुंभ राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

कुंभ कार्ड - Nine of Wands
कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 संमिश्रीत असेल. शनीच्या अमलाखाली आपणांस अधिक श्रम करावे लागतील. आपल्या कारकीर्दीत आपणांस समस्यांना सामोरी जावे लागेल. नैराश्य येऊ शकते. आशावादी राहा. सगळे चांगले होईल. फॅशन किंवा इंटीरियर डिझाईनिंगमध्ये असणाऱ्यांना लाभ मिळू शकते. आपले कुटुंबासोबत वादविवाद होऊ शकतात. आपली मते आपण स्पष्ट ठेवा. पाठदुखीचा त्रास उद्भवेल. योग्य वेळी उपचार करा. विवाहितांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराशी किरकोळ भांडण होईल पण आपण पुन्हा एकत्र वेळ घालवाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्न चांगले राहतील. खर्चावर आळा घाला.
 
करियर :- कारकीर्दीत आपल्या विचारांची जाणीव होईल. आपले कौतुक होतील. नवी जबाबदारी घ्याल आणि उत्तमरीत्या पार पाडाल.
 
व्यवसाय :- सर्जनशील क्षेत्रातील व्यक्ती उत्तम कारागिरी करतील. आपण नवे अनुबंध कराल. त्यामुळे आपणांस लाभ होतील. आपले उत्पन्न सुधारेल.
 
कुटुंब :- आपण आपले संभाषण स्पष्ट ठेवा. आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्या. कुटुंबाला वेळ द्या.     .
 
आरोग्य :- तणावाचा आरोग्यांवर परिणाम होईल. आपण आपल्या कुटुंबासाठी चिंतीत असता. कंबर आणि पाठीचे त्रासाने ग्रस्त असाल. वजन उचलू नका. वाहन चालविताना काळजी घ्या.
 
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- विवाहितांसाठी हे वर्ष आनंदी असेल. जोडीदाराची साथ लाभेल. जुने संबंध जुळतील. लांबच्या नात्यातले संबंध चांगले होतील.
 
आर्थिक स्थिती :- आपण उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांचा विचार करू शकता. आपण नवीन व्यवसाय सुरू केल्यास आपल्याला फायदेशीर ठरेल.
 
टिप :- सकारात्मक ऊर्जेसाठी डायनिंग हॉलमध्ये आरसे ठेवा.
घर आणि ऑफिसच्या दक्षिण दिशेस एक victory  horse आणि फिनिक्स ठेवा.