रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:37 IST)

Numerology Prediction 2020 मूलांक 3 साठी अंक ज्योतिष

मूलांक 3 असणार्‍यांना ह्या वर्षी अतिशय सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आयुष्यात आव्हाने येऊ शकतात ज्यावर आपणास खूप विचार करावा लागू शकतो. 
 
आपणास ह्या वर्षी आरोग्यविषयक समस्यांना सामोरा जावं लागू शकतं. खाण्यापिण्याचा चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडू शकते. ह्या वर्षी आरोग्याशी संबंधित समस्यांविषयी आपल्याला खूप सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. बृहस्पती शरीरातील चरबीला नियंत्रित करतं. खाण्यापिण्याच्या हलगर्जी पणामुळे आपले वजन वाढू शकते. 
 
ह्या वर्षी कार्य क्षेत्रातील चढ-उतारामुळे आपण व्यस्त असणार. ह्या वर्षी ह्या मूलकांच्या व्यापार्‍यांना खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागेल. या वर्षी बर्‍याच लोकांना परदेशी वारीची शक्यता आहे. प्रवासासाठी खर्च होईल. त्यामुळे आर्थिक ताण येऊ शकतो. उत्पन्नाचे बघूनच खर्च करा नाहीतर परिस्थिती बिघडू शकते.
 
या वर्षी कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे गरजे चे आहे. योग्य मार्गदर्शनानेच गुंतवणूक करा. अन्यथा आपणास तोटा संभवतो. योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कार्य केल्यास आपणास चांगले परिणाम मिळतील.