मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:37 IST)

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: मीन

आर्थिक दृष्ट्या हे वर्ष आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे. म्हणूनच तयारीसाठी सज्ज व्हा आणि या कालावधीचा पूर्ण फायदा घेण्याची कोणतीही संधी मुकू देऊ नका. वर्षाच्या सुरुवातीस दीर्घकालीन फायदा होईल. आपल्या प्रयत्नांना यश मिळेल.
 
बऱ्याच दिवसापासूनची रखडलेली कामे पूर्ण होतील. त्याचा आपणास फायदा होईल. या व्यतिरिक्त, परदेशी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आणि परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. ही परिस्थिती वर्षाच्या मध्यात आणखी वाढेल आणि आपल्याला एकापेक्षा जास्त स्रोतातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.
 
ह्या वर्षी मालमत्ता भाड्याने देऊन आपण चांगला नफा देखील मिळवू शकता. जर आपले पैसे बराच काळ अडकले असतील तर या वर्षी ते मिळण्याची शक्यता आहे. तथापि, त्यासाठी आपणास काही प्रयत्न करावे लागतील. आपल्या कुटुंबामध्ये शुभ कार्यांसाठी पैसे खर्च होतील.. आपण जास्तच जास्त नफा मिळविण्याकडे सज्ज असाल.  
 
आपण वाहन किंवा घर खरेदी करू शकता. कुटुंबासाठी खर्च कराल. गुंतवणुकीचा विचार करू शकता. मे ते जून या कालावधीत खर्चामध्ये जास्त वाढ असू शकते, म्हणून यावेळी कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः हे वर्ष आपल्याला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात यशस्वी होईल आणि आपण उत्कृष्टरीत्या धनार्जन करू शकाल.