सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated : सोमवार, 23 डिसेंबर 2019 (12:56 IST)

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: मीन

मीन राशीच्या जातकांसाठी या वर्षाच्या सुरुवात प्रेम संबंधांसाठी अनुकूल आहे आणि या कारणामुळे आपली लव्ह लाईफला गती मिळेल. परंतू वर्षाची शेवट प्रेम जीवनासाठी काही आव्हानात्मक असू शकते. 
 
वर्षाच्या सुरुवातीला आपण आपल्या कार्य क्षेत्रात अधिक व्यस्त राहाल ज्यामुळे आपल्या पार्टनरला वेळ देऊ शकणार नाही. हे अंतर वाढता कामा नये याची काळजी घ्यावी. 
 
या वर्षी आपल्या लव्ह लाईफची कठिण परीक्षा असणार आणि जर आपण सच्चे असाल, आपलं प्रेम पवित्र असेल तर आपल्याला कुठलाही समस्या तोडू शकणार नाही. देखावा असल्यास नात्यात ताण आणि वादाची स्थिती निर्माण होऊ शकते, दुरावा देखील येऊ शकतो.
 
मे ते सप्टेंबर पर्यंतच काळ कठिण असेल या दरम्यान सांभाळून वागावे. फेब्रुवारी ते मार्च वेळ जरा योग्य असेल. या दरम्यान नवीन व्यक्ती जीवनात प्रवेश करू शकतो. आपल्या कामातून वेळ काढून पार्टनरला वेळ देणे देखील आवश्यक ठरेल.