रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:41 IST)

Numerology Prediction 2020 मूलांक 7 साठी अंक ज्योतिष

मूलांक 7 चा स्वामी ग्रह केतू आहे. या मूलकांचे लोक दुसर्‍यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असतात. 2020 आपल्यासाठी सकारात्मक असेल. हे वर्ष आपणास उपयुक्त आहे. ह्या वर्षी आपले कौतुक केले जातील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल. 
 
आपल्या ठराविक जीवनशैली मुळे आपण पुढे वाढाल. ह्या वर्षी दैवीय कृपा आपल्यावर राहणार आहे. आपण कोणताही व्यवसाय केल्यास आपणास चांगले फळ मिळेल. कौटुंबिक जीवनातही सुख-शांती मिळेल. या वर्षी आपल्या जास्तीत जास्त गरजू लोकांना मदत करणे चांगले होईल.
 
ह्या वर्षी आपण आपल्या चुकांहून नक्की शिकाल. याचा फायदा देखील आपणास नक्की होईल. अन्यथा आपल्याला काही अडचणींना सामोरा जावं लागू शकतं. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. बुधवारी कोणालाही पैसे उसने देऊ नका, परत मिळणार नाही. सामाजिक कार्य करा, चांगले होईल.