शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (16:38 IST)

Beauty Hacks: चेहऱ्यावरील जमलेलं तेल काढण्याचे 3 सोपे उपाय जाणून घ्या

प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेग वेगळा असतो. त्या प्रमाणे आपली त्वचा आहे. प्रत्येकाच्या शरीरात सीबम बनवणाऱ्या तेलाच्या ग्रंथी असतात, ज्यामुळे चेहरा उजळतो.

पण काही असे लोक आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर चमक सह भरपूर तेल देखील असत.यामुळे चेहरा नक्कीच चमकदार होतो,पण चेहऱ्यावर मुरुमही अधिक असतात.अधिक प्रमाणात तेल असल्यामुळे, कधीकधी चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात, नंतर ते मोठे मुरुम होऊ लागतात.चला तर मग जाणून घेऊया तुमच्या चेहऱ्यावरील तेल त्वरितच कसे दूर करावे -
 
1. दिवसातून तीन वेळा चेहरा धुवा -  एखाद्याच्या गालावर भरपूर तेल येतं ,तर कुणाच्या कपाळावर, नाकावर किंवा वरच्या ओठांवर तेल येते. तेलकटपणा कमी करण्यासाठी दिवसातून किमान 3 वेळा आपला चेहरा धुवा. त्यापेक्षा जास्त नाही. दररोज हलक्या हाताने पाण्याने चेहरा धुवा.चेहऱ्याचे तेल एका महिन्यात कमी होण्यास सुरुवात होईल.
 
2. मॉइश्चरायझर अवश्य लावा - चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. जर आपण  चेहऱ्यावर काहीही लावले नाही तर जास्त तेल चेहऱ्यावर येईल. हायड्रेटेड चेहऱ्यावरील तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात.
 
3.नोज स्ट्रिप्स वापरा - जर तुमच्या नाकावर भरपूर तेल येत असेल तर आपण  नोज स्ट्रिप्स वापरू शकता. हे बाजारात सहज उपलब्ध असतात.15 दिवस ते 1 महिन्यानंतर आपल्याला फरक दिसू लागेल.नोज स्ट्रिप्स लावल्याने नाकावर जमा झालेले अतिरिक्त तेल स्ट्रिप्स ने शोषले जाते.