Marathi Biodata Maker
✕

स्वयंपाकघरातील हे घटक हिवाळ्यात वापरू नका त्वचा अधिक कोरडी होईल

Updated: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (17:36 IST)
 
हिवाळ्यात त्वचेमधून आद्रता कमी होते किंवा नाहीशी होते, ज्या मुळे त्वचा कोरडी पडते. अशा परिस्थितीत काही असे स्वयंपाकघरातील घटक आहे ज्यांचा वापर हिवाळ्यात करू नये. जर आपली त्वचा कोरडी आहे तर चुकून देखील ह्याचा वापर करू नका. कारण या मुळे त्वचा ओढलेली किंवा त्वचेत खाज होऊ शकते. 
 
1 तांदळाचे पीठ-
तांदळाच्या पिठाचा वापर फेस पॅक बनविण्यासाठी केला जातो. कारण हे त्वचेला घट्ट करण्याचे काम करतो. तथापि ह्याचा वापर हिवाळ्यात करू नये. कारण हे त्वचेला कोरड करत. हिवाळ्यात ह्याचा वापर केल्यानं लाइन्स आणि सुरकुत्या होऊ शकतात. या शिवाय आपण अशा वस्तू वापरा ज्यामुळे त्वचेमध्ये ओलसर पणा टिकून राहील, जसं की बदाम, व्हिटॅमिन ई. इत्यादी. 
 
2 हरभराडाळीचे पीठ -
हरभराडाळीच्या पिठाचा वापर मुली नेहमी क्लिन्झर, फेस मास्क आणि बॉडी स्क्रब म्हणून वापरतात, परंतु आपली त्वचा कोरडी किंवा कॉम्बिनेशन ची आहे तर हरभराडाळीचे पीठ वापरू नका. तेलकट त्वचा असणारे हरभराडाळीचे पीठ वापरू शकतात. कारण ह्या मध्ये तेलकटपणा कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. हिवाळ्यात त्वचेला हायड्रेशन आणि पोषण ची गरज असते आणि हरभराडाळीचे पीठ त्याची शक्यता पूर्ण करतात.    
 
3 काकडी- 
काकडी त्वचेला कोरडी करण्यात आणि हायड्रेट करण्यात मदत करते, परंतु या मध्ये नैसर्गिक आस्ट्रिजन्ट चे गुणधर्म असतात या मुळे ह्याचा वापर हिवाळ्यात करू नये. हे वापरल्याने त्वचा कोरडी होते, काकडी त्वचेला नुकसान देऊ शकते. काकडी त्वचेमधून तेलाला कमी करण्याचे काम करते. विशेषतः डोळ्या भोवती जवळच्या जागेतून  . जर आपली त्वचा अधिक तेलकट आहे तर आपण ह्याचा वापर करू शकता. 
 
4 बटाटा- 
बटाट्यात स्टार्च जास्त प्रमाणात असत, हे त्वचेला घट्ट करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हिवाळ्यात बटाटा वापरू नये कारण या मध्ये असलेल्या स्टार्चच्या प्रमाणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. जर आपली त्वचा आधीच कोरडी आहे तर ह्याचा वापर केल्यानं त्वचेमध्ये खाज किंवा जळजळ होऊ शकते. म्हणून बटाट्याचा वापर उन्हाळ्यात फेस मास्क साठी करणे अधिक योग्य आहे. 
 
5 लिंबू-
लिंबू हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे, पण हिवाळ्यात ह्याचा वापर करणे टाळावे. लिंबाच्या रसात अधिक अम्लीयता आहे आणि आपली त्वचा या मुळे अधिक कोरडी होऊ शकते या मुळे जळजळ किंवा इतर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपली त्वचा कोरडी आहे तर हिवाळ्यात अजिबात ह्याचा वापर करू नये.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

सकाळी हवाय नॅचरल ग्लो? मग रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' गोष्टी!

बटाट्याचा कंटाळा आला असेल तर उपवासासाठी बनवा रताळ्याच्या कुरकुरीत टिक्की; चवीला अप्रतिम

वजन घटवण्यासाठी सुका मेवा कसा भिजवावा? जाणून घ्या योग्य पद्धत

१२वी PCM आणि JEE Main उमेदवारांसाठी भारतीय लष्करात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

पुढील लेख
Show comments