1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified बुधवार, 30 जून 2021 (09:15 IST)

त्वचेत चमक आणण्यासाठी या 5 गोष्टी अवलंबवा

आपण कमी वेळात आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळवू इच्छित आहात तर आपण या 5 गोष्टींना अवलंब करून 15 दिवसातच चेहऱ्यावर चमक मिळवू शकता.या साठी आपल्याला या 5 गोष्टींना नियमितपणे वापरायचे आहे.जो पर्यंत फरक दिसत नाही.
 
1 त्वचेवर कोणत्याही तेलाची मालिश करून,रक्ताचा प्रवाह वाढतो आणि त्वचा चमकते. परंतु जर आपली त्वचा कोरडी असेल तर आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर बदामाच्या तेलाची मालिश करायलाच हवी.
 
 
2 आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर हरभराडाळीचे पीठ आणि लिंबाचा फेस मास्क लावा.हे बनवायला सोपे आहे.आपल्याला दोन चमचे हरभराडाळीच्या पिठात काही थेंब लिंबाचा रस मिसळायचा आहे.आणि हे पेस्ट लावायचे आहे.असं केल्याने चेहऱ्यावर चमक येते.
 
3 भरपूर प्रमाणात पाणी पिण्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. म्हणून, सुंदर त्वचा मिळविण्यासाठी आपण दररोज 8-12 ग्लास पाणी प्यावे.
 
 
4 काकडी खाल्ल्यानेही चेहऱ्यावर चमक येते.दररोज एक काकडी खाण्याचा प्रयत्न करा. या मध्ये असलेले व्हिटॅमिन्स त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
 
 
5 नारळ पाण्यामुळे त्वचा टोन होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.या मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळते या मुळे हाड मजबूत होतात आणि अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.म्हणून दररोज नारळ पाणी प्यावं.