शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (16:03 IST)

Lip Beauty in Winter : हिवाळ्यात ओठांच्या सौंदर्यासाठी खास टिप्स

Beauty Tips
Lip Beauty in Winter सुंदर ओठ सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मऊ, नाजूक, गुलाबी ओठांना थंडीत विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यावी चला काही टिप्स जाणून घेऊ या.
 
ऑलिव्ह ऑईल आणि व्हॅसलीन मिक्स करून दिवसातून तीन ते चार वेळा फाटलेल्या ओठांवर लावा. तीन ते चार दिवसांच्या नियमित उपचारानंतर, आपल्या ओठांतील भेगा बऱ्या होऊ लागतात किंवा भरून येतात.
 
ओठ फुटले असतील तर थोडे मध घेऊन बोटाने ओठांवर हलक्या हाताने चोळा. फक्त काही दिवसांच्या प्रयत्नाने तुमचे ओठ पूर्वीसारखे चमकदार आणि मऊ होतील.
 
दोन चमचे कोको बटर, अर्धा चमचा मध मेण घ्या. उकळत्या पाण्यात एका भांड्यात मेण वितळवा. त्यात कोको बटर घाला. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. लिप ब्रशच्या मदतीने ते ओठांवर लावा. यामुळे ओठांचे सौंदर्य टिकून राहील.