शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

पुराणांप्रमाणे अश्या लोकांचा नाही होत पुनर्जन्म

जेव्हा राजा भागीरथी ने यमदेवाला विचारले की मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं तर यमाचं उत्तर ऐकून भागीरथी आश्चर्यात पडले जेव्हा त्यांना कळले की मृत्यूनंतरही आत्म्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत मुक्ती मिळत नाही.
 
मोक्ष प्राप्तीसाठी आत्म्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. मोक्ष प्राप्तीसाठी चांगले कर्म करावे लागतात. यम आणि भागीरथी यांच्यात झालेल्या वार्तालापाला नारद पुराणात चांगल्या रूपात प्रस्तुत केले गेले आहे. त्यात मृत्यू, जन्म-कर्म चक्र व्यवस्थित समजवले गेले आहे. हेही सांगितले आहे की कोणत्या तीन प्रकारे लोकांना सोप्यारित्या मोक्षाची प्राप्ती होते.
1. जे लोकं एकादशीला विष्णू देवाची पूजा सुवासिक फुलांनी करतात त्यांना 10,000 जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळेल आणि कमी काळातच ते मोक्ष प्राप्त करतात.

2. महादेवाची आरती करताना जे भक्त तुपाचा दिवा लावतात त्यांना सहज मोक्षाची प्राप्ती होते. अश्या लोकांना गंगा स्नान करण्याएवढे पुण्य प्राप्त होतं.
 
3. जे लोकं आपल्या अंगणात तुळशीचे रोप लावून दररोज तुळशीची पूजा करतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. अश्या लोकांना वैकुंठात स्थान मिळतं.