गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सातव्या वेतन आयोगातील भत्तेवाढीला मंजुरी

केंद्र सरकारकडून बुधवारी सातव्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तेवाढीला मंजुरी देण्यात आली. सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा एकूण ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती. घर भाडे भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनाच्या ६० टक्के इतका असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होईल. केंद्र सरकारने वेतनवाढ जाहीर केल्यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आज भत्तेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. आयोगाने सुचविलेल्या एकूण ३४ सुधारणा केंद्राने मंजुर केल्या. येत्या १ जुलैपासून या सुधारणांची अंमलबजावणी होईल.