Marathi Biodata Maker
✕

भारतात क्रिप्टोकरन्सी व्यापारात क्रांती घडवण्यासाठी बीटबेचा भारतात प्रवेश

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (10:50 IST)
 
बीटबेचे सीईओ सिल्व्हेस्टर सुझेक म्हणाले, “ग्राहकांना कल्पक सेवा पुरवण्यासाठी तसेच जलद आणि सुरक्षित अर्थव्यवहार करुन क्रिप्टोकरन्सीच्या देवाणघेवाणीला सुरक्षितपणे चालना देण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.”
 
बीटबे इंडियाचे प्रमुख रोहित दाहडा म्हणाले, डिजीटायझेशनच्या वाटेवर असलेली भारत ही सर्वाधिक वेगाने वाढत जाणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. “आम्ही भारतात बीटबे ही कंपनी आणली आहे कारण भारतातील विविध क्रिप्टोकरन्सींना आमच्या एकसंध व्यासपीठाच्या माध्यमातून व्यापारी चालना देणे हा आमचा मूळ उद्देश आहे. बीटबे इंडियासाठी सर्व नियोजित नियम राबविण्यासाठी आम्ही सर्व गरजेच्या उपाययोजना राबवत आहोत. सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आम्ही लवकरच आमच्या व्यासपीठावर काही नवीन फिचर्स आणणार आहोत. आम्ही दर्जेदार सुरक्षा मॉडेल अंगिकारत असून सुरक्षित वित्त व्यवहारांसाठी दोन स्तरांचे ऑथेंटिकेशन मॉडेलही राबवणार आहोत.”    
  
इतर कोणत्याही वित्तीय देवाणघेवाण व्यासपीठावर पुरवले जात नाहीत असे फायदे बीटबे इंडिया या व्यासपीठावरुन ग्राहकांना मिळतात. यात कोल्ड वॉलेट पॉलिसी आणि २ एफए ऑथेंटिफिकेशन सोल्यूशन्सचा समावेश आहे. जगातील सर्वोत्कृष्ठ पेमेंट पुरवठादारांशी व स्थानिक सेवादारांशी संगनमत करुन बीटबे इंडियाने ग्राहकांना सुरक्षित व जलद डिपॉझिट्सचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. बीट कोईनव्यतीरिक्त बीटबे इंडियातर्फे ६ विविध क्रिप्टोकरन्सींचा स्थानिक चलनातील व्यापार मंजूर करण्यात आला आहे. १० ते २४ ऑगस्ट या कालावधीत बीटबेच्या ग्राहकांना प्रायोगिक तत्वावर क्रिप्टोकरन्सींची देवाणघेवाण करणे व बीटबेची कार्यप्रणाली समजून घेण्याची संधी देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर २४ ऑगस्टपर्यंत सर्व नोंदणीकृत सदस्यांना गेमक्रेडिट्स आणि मोबाईल गोतर्फे उच्च पातळीवरील वित्त व्यवहार करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा. 

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments