CNG Cars Under 5 Lakhs ५ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या सर्वोत्तम CNG कार; पाहा फीचर्स
जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि सीएनजी मॉडेल घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम आणि परवडणाऱ्या पर्यायांची यादी तयार केली आहे. अशा अनेक कार आहेत ज्या कमी किमतीत उत्तम इंजिन आणि प्रभावी पॉवर देतात—काही कार तर ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. चला, या कार्सवर एक नजर टाकूया.
मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी (Maruti Suzuki S-Presso CNG)
मारुती सुझुकी एस-प्रेसो ही या यादीतील सर्वात स्वस्त सीएनजी कार आहे, जिची एक्स-शोरूम किंमत ४.६४ लाख रुपयांपासून ५.१४ लाख रुपयांपर्यंत आहे. यात कंपनीकडूनच बसवलेली सीएनजी किट मिळते आणि ती LXi (O) व VXi (O) variants उपलब्ध आहे. या कारमध्ये १.०-लिटरचे नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे सीएनजी मोडवर ५७ पीएस (PS) पॉवर आणि ८२ एनएम (Nm) टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, सीएनजी मोडवर ही कार ३२.७३ किमी/किलो मायलेज देते, तर पेट्रोल मोडवर २५.३० किमी/लिटरपर्यंत मायलेज मिळते. सीएनजी आवृत्तीमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध नाही आणि सीएनजी सिलिंडरमुळे बूट स्पेस (डिग्गीतील जागा) काहीशी मर्यादित आहे.
मारुती सुझुकी अल्टो के१० सीएनजी (Maruti Suzuki Alto K10 CNG)
अल्टो के१० सीएनजीची एक्स-शोरूम किंमत ४.८४ लाख रुपयांपासून ५.३४ लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार देखील LXi (O) आणि VXi (O) प्रकारांत उपलब्ध असून यात फॅक्टरी-फिटेड सीएनजी किट मिळते. याचे १.०-लिटर पेट्रोल इंजिन सीएनजीवर चालताना ५७ पीएस (PS) पॉवर आणि ८२.१ एनएम (Nm) टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या माहितीनुसार, ही कार ३३.४० किमी/किलो इतके मायलेज देऊ शकते. सीएनजी पर्यायासोबत यात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळत नाही आणि सिंगल-सिलिंडर सेटअपमुळे बूट स्पेस कमी होते. मात्र, ही कार ६ एअरबॅग्ज आणि आवश्यक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
रेनॉल्ट क्विड सीएनजी (Renault Kwid CNG)
ज्यांना लहान कारमध्ये एसयूव्हीसारखा लूक हवा आहे, त्यांच्यासाठी रेनॉल्ट क्विड हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये सीएनजी किट बसवण्याची सुविधा (रेट्रोफिट पर्याय) काही निवडक अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध आहे. याची एक्स-शोरूम किंमत ५.२३ लाख रुपयांपासून ५.८५ लाख रुपयांपर्यंत आहे. सीएनजीचा पर्याय 'इव्होल्यूशन' (Evolution) आणि 'क्लायंबर' (Climber) या व्हेरियंट्समध्ये मिळतो. यात १.०-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे पेट्रोल मोडवर ६९ पीएस (PS) पॉवर आणि ९२.५ एनएम (Nm) टॉर्क निर्माण करते. सीएनजी मोडसाठी कंपनीने अधिकृत पॉवर आणि टॉर्कची आकडेवारी जाहीर केलेली नाही. या कारमध्ये सीएनजी पर्यायासोबत ऑटोमॅटिक गिअरबॉक्स किंवा ड्युअल-सिलेंडर सेटअप उपलब्ध नाही.
टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG)
ज्यांना कमी खर्चिक प्रवास आणि उत्तम फीचर्स असलेली कार हवी आहे, त्यांच्यासाठी टाटा टियागो सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत ५.८७ लाख रुपयांपासून ८.६२ लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार स्मार्ट (Smart), प्युअर (Pure), प्युअर प्लस (Pure Plus), प्युअर प्लस ए (Pure Plus A) आणि क्रिएटिव्ह (Creative) अशा व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. यात १.२-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे सीएनजी मोडवर ७५.५ पीएस (PS) पॉवर आणि ९६.५ एनएम (Nm) टॉर्क निर्माण करते. विशेष म्हणजे, टियागो सीएनजीमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसोबतच एएमटी (AMT) ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही मिळतो. तसेच, यात ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे बूट स्पेसमध्ये (डिग्गीमध्ये) काही लहान वस्तू ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहते.

