बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आज पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. दरम्यान, त्यांच्यापुढे अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्याचे मोठे आव्हान आहे.

अर्थसंकल्प सकाळी अकरा वाजता निर्मला सीतारामन सादर करतील. दरम्यान, आधीचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अनेक लोकप्रिय घोषणा केल्या होत्या. त्यावेळी दिलेली आश्‍वासने कायम ठेवण्याचे आव्हानही सीतारामन यांच्यासमोर असणार आहे. दरम्यान, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाऊ शकते. अंतरिम अर्थसंकल्पावेळी सरकारने शेतकर्‍यांना सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता.