बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (10:39 IST)

दोन दिवसांमध्ये सोने हजार रुपयांनी महागले

अमेरिका आणि इराकमधील तणावामुळे दोनच दिवसांमध्ये सोन्याच्या आण चांदीच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
 
सोने 40 हजार 600 रुपये प्रतीतोळा चांदी प्रतिकिलो 48 हजार रुपयांवर पोहोचली आहे. या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सोने व्यापारी बोलून दाखवत आहेत.
 
एका डॉलरसाठी 71.76 रुपये मोजावे लागत असल्यामुळेही सोने आणि महाग झाल्याचे सांगितले जात आहे.