बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2019 (13:07 IST)

तीन महिने घर रिकामे सोडू नका, मंदिराचे दरवाजे देखील बंद करू नका

घराला मंदिर म्हणतात तसेच प्रत्येक घरात देवासाठी मंदिर किंवा देवघर बांधणे खूप महत्त्वाचे आहे. सदैव सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह उपासनागृहामुळेच कायम राहतो. असे मानले जाते की घरात पूजाघर असल्याने नशीब बळकट होत. वास्तूमध्ये घरात मंदिराविषयी काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
 
तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपले घर रिकामे सोडू नका. घराचा संग्रह कधीही रिक्त ठेवू नका. आपल्याला कुठेही जायचे झाले तर देवघराला कधीही कुलूप लावून जाऊ नका. 
 
वर्षानुवर्षे घर रिकामे असेल तर वास्तुशांतीनंतर घर वापरा. 
 
वास्तूप्रमाणे देवघर स्वयंपाकघरात नसावे. देवघरात गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती कधीही उभी ठेवू नका. 
 
पूजा करण्याचे स्थान अंधारात नसावे. ईशान्येकडील पूजागृहामुळे घरात सदैव सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो. पायर्‍याखाली मंदिर बांधू नये. 
 
शौचालय किंवा बाथरूमच्या पुढेही देवघर बांधू नये. बेडरूममध्येही मंदिर नसावे. पूजन घरासाठी तळघर देखील चांगले नाही.
 
जर मंदिर लाकडाचे असेल तर ते घराच्या भिंतीजवळ ठेवू नका. देवतांची दृष्टी मंदिरात एकमेकांवर पडू नये. घुमट, कलश पूजा घरात बनवू नये. 
 
पूजेची सामग्री, धार्मिक पुस्तके मंदिरात ठेवावीत. मंदिरात ठेवलेल्या देवांच्या मूर्तींचा चेहरा कोणत्याही गोष्टींनी झाकून ठेवू नये. एकाच घरात बरीच मंदिरे बांधू नका. घरात जेथे मंदिर आहे त्या दिशेकडे पाय करून झोपू नये.