बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (11:25 IST)

मटका: मातीचा घडा सुद्धा देतो आनंद, जाणून घ्या 6 कामाच्या गोष्टी

हल्ली घरांमध्ये मातीच्या घड्यांऐवजी पाणी ठेवण्यासाठी आधुनिक भांडी वापरल्या जातात. फिल्टर, फ्रीजमध्ये बाटल्या आणि इतर मेटलमध्ये पाणी ठेवण्याची फॅशन असली तरी वास्तु प्रमाणे घरात एक मातीचा घडा ठेवणे कधीही योग्य ठरतं. याने घरातील वातावरण आनंदी राहतं आणि सर्व समस्या दूर होतात.
 
घरात पाण्याने भरलेला मटका असल्यास कधीही धनाची कमी भासत नाही. जाणून घ्या यासंबंधी काही खास गोष्टी: 
 
- घरात मातीचा घडा, मटका किंवा सुराही ठेवणे फायदेशीर ठरतं. यात नेहमी पाणी भरलेलं असावं याची काळजी घ्यावी.
 
- वास्तुप्रमाणे उत्तर दिशा यासाठी सर्वात उत्तम आहे. कारण उत्तर जल दैवताची दिशा मानली जाते.
 
- घरातील एखादं सदस्य तणावग्रस्त किंवा मानसिक रूपाने परेशान असल्यास त्या व्यक्तीने मातीच्या घड्यातून एखाद्या झाडाला पाणी द्यावे, याने लाभ होईल.
 
- माती निर्मित मूर्ती ठेवल्याने देखील घरातील धनासंबंधी समस्या नाहीश्या होतील आणि धन स्थिर राहण्यास मदत होते.
 
- घरात मातीच्या भरलेल्या मटक्यासमोर दिवा लावल्याने आर्थिक कष्ट दूर होतात.
 
- घरात मातीचे लहान-लहान सजावटीचे भांडे ठेवल्याने नात्यांमधील गोडवा टिकून राहतो.