सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 18 जानेवारी 2021 (22:48 IST)

स्वयंपाकघर साठी योग्य रंग, आरोग्य चांगलं राहील

वायव्य दिशा ही स्वयंपाकघरासाठी आदर्श असते. दक्षिण पूर्व दिशा अग्नी तत्त्वाला दर्शवते. अग्नीचा रंग लाल असतो. त्यामुळे स्वयंपाकघराला नारंगी किंवा लाल रंग द्यावा. 
 
पांढरा, पिवळा, नारंगी, गुलाबी आणि हिरवा हे रंग देखील योग्य ठरतात.
 
स्वयंपाकघरात काळा, निळा किंवा अती गडद रंग वापरणे टाळा.
 
हिरवा किंवा हलका पिवळ रंग किचन कॅबिनटसाठी योग्य ठरेल. किचन स्लॅबसाठी देखील हे रंग निवडता येतील.
 
किचन प्लॅटफॉर्मसाठी पिवळा, केशरी आणि हिरवा रंग श्रेष्ठ ठरेल.
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्याकडे स्वतंत्र देवघर नसल्यास स्वयंपाकघरात उत्तर / पूर्वेकडील कोपर्‍यात मंदिर असू शकते. परंतू अशात घरात मांसाहार शिजवणे योग्य नाही.