रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (20:49 IST)

वास्तुशास्त्रात सकाळी उठण्याचे काही नियम सांगितले आहेत जाणून घ्या

सकाळी उठल्यावर काही वाईट शकुन बघू नये असं म्हणतात जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असते त्यावेळी संधीकाळ असतो. म्हणून वास्तु शास्त्रात सकाळी उठण्याचे काही नियम सांगितले आहेत. 
रात्र आणि दिवस किंवा दिवस आणि रात्र एकत्र येण्याचा काळ संधीकाळ असतो. अशा काळात आपला मेंदू खूप संवेदनशील असतो. अशा काळात काही वाईट आणि नकारात्मक काम करणे आणि वस्तूंना बघणे टाळावे. 
 
बऱ्याच लोकांची सवय असते की ते उठल्या बरोबर आरसा बघतात, जे वास्तुशास्त्रानुसार शुभ नसतं. असं केल्यानं दिवसभर आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहू शकतो. 
 
वास्तु शास्त्रात उठण्याचे नियम -
 
* सकाळी उठल्यावर अशा व्यक्तीचा किंवा प्राण्याचा चेहरा बघू नका ज्याला बघून आपल्या मनात वाईट भाव येतात. 
* सकाळी उठल्यावर मेंदूवर अधिक ताण देऊ नका. वृत्तपत्र वाचणे आणि टीव्ही बघण्यासारखे कामे मेंदूला विश्रांती दिल्यावर करा. 
* सकाळी उठल्यावर अशा प्राण्यांचे नावे घेऊ नका जे वाईट मानले गेले आहे. जसं की माकड,डुक्कर किंवा कुत्रा.
* सकाळी उठल्यावर कोणाच्या रडण्याची आवाज ऐकणे वाईट शकुन मानतात. म्हणून टीव्हीवर रडण्याचे कार्यक्रम बघू नका.
* सकाळी- सकाळी तेलाचे भांडे सुई-दोरा सारख्या वस्तु बघू नये हे वाईट मानले जाते.
* सकाळी उठल्यावर रात्रीच्या गोष्टीवरून वितंडवाद करू नये. 
*सकाळी उठल्यावर उगवत्या सूर्याला बघून नमस्कार करा.
* सकाळी उठल्यावर घरात किंवा कार्यालयात जाऊन लोकांशी कठोर भाषेत बोलू नका.
* सकाळी उठून देवाचे नाव घ्या. 
* सकाळी उठून कुलदेवाला नमस्कार करून दररोजचा दिवस चांगला होण्याची इच्छा करावी.
* सकाळी उठल्यावर लगेच कॉम्प्युटर, मोबाइलवर व्यस्त होऊ नका काही  वेळ सूर्याच्या किरणांना बघा.
* सकाळी शौच केल्या शिवाय जेवू नये.
* सकाळी उठल्यावर दात घासा नंतर अंघोळ करून देवाची प्रार्थना करा. या मुळे आयुष्य यशस्वी होते.
* सकाळी उठून आपल्या इष्ट देवाची पूजा किंवा प्रार्थना करा.
* सकाळी उठून पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकावे किंवा लहान बाळांचे रडणे ऐकणे शुभ आहे.