सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 9 जानेवारी 2021 (09:55 IST)

कामाचे उपयोगी टिप्स : वास्तु आणि स्वयंपाकघर

* रात्री झोपण्याच्या पूर्वी घराच्या स्वयंपाकघरात पाण्याची एक बादली भरून ठेवा. या मुळे कर्ज पासून मुक्ती मिळते. तसेच स्नानगृहात पाणी भरून ठेवल्यानं देखील जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतात.
 
* घराच्या प्रवेश दाराजवळ कधीही कचराकुंडी ठेवू नका. असे म्हणतात की असं केल्याने शेजारच्यांशी शत्रुत्वाचे संबंध होतात. 
 
* वास्तु शास्त्रानुसार, पलंगावर बसून कधीही जेवू नये. असं केल्याने घरात अशांतता होते आणि घरातील सदस्य कर्जबाजारी होण्याची दाट शक्यता असते.
 
* स्वयंपाकघरात रात्री उष्टे भांडे ठेवू नका. जर आपण रात्री भांडे स्वच्छ करू शकत नाही तर ते फक्त पाण्याने धुऊन ठेवून द्या. या मुळे पैश्याची हानी होणार नाही.
 
* सूर्यास्ताच्या वेळी कोणालाही कांदा, दूध, दही, देऊ नका. असं म्हणतात की या मुळे घरात बरकत आणि सौख्य समृद्धी नाहीशी होते.
 
* कलश किंवा लहान तांब्याला घरातील देवघरात ईशान्य कोणात पाण्याने भरून ठेवा. असं केल्याने घरात राहणाऱ्या लोकांसाठी शुभ मानले जाते.