शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (08:57 IST)

अटैच स्नानगृह बनविण्यापूर्वी वास्तूचे नियम समजून घ्या

आधुनिक काळात जेवढ्या चांगल्या घराचे बांधकाम होत आहे, त्यापेक्षा अधिक लक्ष स्नानगृहाच्या सौंदर्येकडे दिले जात आहे. आपण बऱ्याच ठिकाणी संयुक्त स्नानगृह बघता, जे सर्व सोयीने युक्त असतात आणि सोयीस्कर देखील असतात. तरी ही वास्तुनुसार, एकत्र स्नानगृह बांधणे योग्य मानले जात नाही आणि या मुळे वास्तूमध्ये बरेच नुकसान होतात.
 
वास्तुनुसार, स्नानगृहात चंद्रमाचे वास्तव्य सांगितले आहे. चंद्रमा हे मनाचे आणि पाण्याचे कारक देव आहे, अशा प्रकारे जर चंद्रमा व्यवस्थित आहे तर मनावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि जर चंद्रमा अशुभ आहे तर माणसाचं मन दुखी होऊन विलगतेकडे वळतो. स्वच्छतागृहासाठी वास्तू मध्ये सांगितले आहे की या मध्ये राहूचा वास असतो. राहू थेट आपल्या मेंदूत दोष उत्पन्न करतो. म्हणून चंद्रमा आणि राहू एकत्र आल्यावर ग्रहणाचे योग उत्पन्न होतात.
 
वास्तूमते, अटैच स्नानगृहाचे दुष्परिणाम - 
जर आपण देखील अटैच स्नानगृहाचे बांधकाम केले आहे तर याचे दुष्परिणाम बघू शकता. असं म्हणतात की संलग्न शौचालय आणि स्नानगृहात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये वितंडवादाची स्थिती बनलेली राहते.लहान लहान गोष्टींवरून वाद होण्याचा धोका संभवतो. अटैच स्नानगृहाच्या घरात राहणाऱ्या लोकांमध्ये सहनशीलतेची कमतरता होऊ लागते आणि अगदी लहान गोष्टी देखील ते सहन करू शकत नाही. या संदर्भात लाल 'किताब मध्ये सांगितले आहे की लेटबाथ बनविण्यामुळे घराच्या आत राहणाऱ्यासह अपघात होण्याची शक्यता वाढते.तर लाल किताबामध्ये लेटबाथ स्वच्छ ठेवण्याचे सांगितले आहे.
 
* स्नानगृहासाठी वास्तूचे नियम - 
वास्तुशास्त्राच्या प्रमुख ग्रंथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'विश्वकर्मा प्रकाश' मध्ये सांगितले आहे की स्नानगृह किंवा स्वच्छतागृहाचे बांधकाम नेहमी घराच्या पूर्वदिशेला करावे.जर आपल्या स्नानगृहात वास्तुदोष आहे तर या साठीचे उपाय म्हणून स्नानगृहात निळ्या रंगाची बादली आणि मग चे वापर करावे आणि चुकून देखील स्नानगृहात चित्र लावू नये.स्नानगृहात आरसा लावू शकता.
 
* स्वच्छतागृहासाठी वास्तूचे नियम - 
विश्वकर्मा प्रकाशानुसार, स्वच्छतागृहाचे बांधकाम दक्षिण दिशेला आणि दक्षिण पश्चिम दिशेच्या मध्य करवावे. जर आपण चुकीच्या दिशेला बांधकाम केले आहेत तर या मुळे उत्पन्न झालेल्या विकारांना दूर करण्यासाठी स्वच्छतागृहाच्या बाहेर शिकार करतानाच्या सिंहाचे चित्र लावावे.