गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (12:47 IST)

पूजा करताना हे जमिनीवर ठेवू नये, नियम माहित नसतील तर वाचा

वास्तुनुसार अशा अनेक वस्तू असतात ज्या घरात ठेवणे शुभ मानले गेले आहे. वास्तु दोष दूर केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते असे म्हटले गेले आहे. तसेच पूजा-पाठ संबंधी काही नियम वास्तुमध्ये सांगण्यात आले आहे. त्यापैकी विशेष म्हणजे काही वस्तू अशा आहेत ज्या चुकुनही जमिनीवर ठेवू नये. असे केल्याने पूजेचं फल लाभत नाही.
 
देवाची मूर्ती किंवा फोटो
अनेकदा देवघराची सफाई करताना लोक देवाची मूर्ती किंवा फोटो जमिनीवर ठेवतात. पण याने वास्तु दोष निर्माण होतो आणि घरात ताण, आर्थिक समस्या उद्भवू शकतात. अशात नेहमी स्वच्छ कपडा किंवा उंच स्थानावर हे ठेवावे.
 
शिवलिंग जमिनीवर ठेवण्याची चूक करु नये
अनेकदा देवघर स्वच्छ करताना लोक शिवलिंग सुद्धा थेट जमिनीवर ठेवून देतात. परंतू याने दारिद्रय येतं. नेहमी शिवलिंगाखाली स्वच्छ कपडा ठेवा आणि स्वच्छ जागेवर शिवलिंग विराजित करा.
 
चुकुनही शंख जमिनीवर ठेवू नये
शंख वाजवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. शंख देवी लक्ष्मीचा भाऊ असल्याचे मानले जाते. अशात शंख कधीही जमिनीवर ठेवू नये. शंख वापल्यावर लगचे देवघरात योग्य ठिकाणी ठेवावे.
 
फुलं, तुळस
भगवत गीतेनुसार दीप, धूप, यंत्र, पुष्प, तुळस, कापुर चंदन, जपमाला इतर सर्व वस्तू खूप पवित्र असतात. यांचे पूजेत वापर असल्यामुळे या वस्तू जमिनीवर ठेवणे अशुभ ठरतं. या पवित्र वस्तू कधीही जमिनीवर ठेवू नये.
 
पूजा-पाठ सामुग्री जमिनीवर ठेवू नये
पूजा-पाठ संबंधी सर्वच सामुग्री शुभ आणि पवित्र मानली जाते. अशात कलश, पाणी, उदबत्ती, दिवा कोणतीही वस्तू जमिनीवर ठेवणे योग्य नाही. याने वास्तु दोष निर्माण होतो आणि देवी लक्ष्मीची नाराजगी सहन करावी लागते अशात प्रत्येक वस्तू ताम्हण, ताटली, स्वच्छ कापड यावर ठेवून उंच जागेवर ठेवावी.