बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता

आरबीआयने रेपो  दरात 0.35 टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. यासोबतच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि भारत बिल पेमेंट सिस्टिम (BBPS) संबंधित चांगले निर्णय आरबीआयने घेतले आहेत.
 
आता डिसेंबर 2019 पासून 24 तास NEFT चा वापर निधी ट्रान्सफर करण्यासाठी होणार आहे. दरम्यान, सध्या ही NEFT ची सेवा महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथा शनिवार सोडून कामकाजाच्या प्रत्येक दिवशी सकाळी 8 ते रात्री 7 पर्यंत उपलब्ध आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, डिसेंबरपासून NEFT यंत्रणा 24*7 उपलब्ध असणार आहे. या माध्यमातून रीटेल पेमेंट सिस्टिममध्ये क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे.
 
याचबरोबर, प्रीपेड रिचार्जेस सोडून सर्व बिलपेयर्सला भारत बिल पेमेंट सिस्टिम (BBPS) मध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. भारत बिल पेमेंट सिस्टिमद्वारे सध्या डीटीएच, इलेक्ट्रिसिटी, गॅस, टेलिकॉम आणि पाण्याचे बिल येते. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत आरबीआय यासंबंधी विस्तृत माहिती एकत्र करणार  आहे.