मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

Honor Watch Magic विक्रीसाठी Amazon वर उपलब्ध

गेल्या महिन्यात Honor ने हॉनर व्यू 20 सह Honor Watch Magic लॉन्च केले होते. कंपनीने Honor Watch Magic चे फीचर्स आणि किंमत दोन्ही जाहिर केले होते परंतू उपलब्धतेबद्दल सांगितले नव्हते. आता हे स्मार्टवॉच Honor Watch Magic विशेषत: ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॅन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. Honor Watch Magic चे लावा ब्लॅक स्पोर्ट्स व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये आहे. त्याचवेळी, याच्या मूनलाइट सिल्वर व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे.  
 
या स्मार्टवॉचमध्ये 1.2 इंच एचडी एमोलेड डिस्प्ले आहे. हे स्मार्टवॉच रियल-टाइम हार्ट रेट, स्विम स्ट्रोक ओळखण्यात सक्षम आहे. या व्यतिरिक्त आपल्याला या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस, बॅरोमीटर आणि एनएफसी सपोर्ट मिळेल. Honor Watch Magic मध्ये 178 एमएएच बॅटरी आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर 7 दिवस पर्यंत बॅटरी बॅकअप देते.