suvichar

जेट एअरवेजची सेवा बंद

गुरूवार, 18 एप्रिल 2019 (10:27 IST)
जेट एअरवेजने बुधवारी मध्यरात्रीपासून आपली सेवा बंद केली आहे. मध्यरात्रीनंतर जेट एअरवेजची सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित झाली आहेत. जेट एअरवेजचा कारभार सुरु ठेवण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. त्यासाठी जेट नव्या गुंतवणूकदारांकडे आस लावून बसली होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य न दिल्यामुळे अखेर जेटची सेवा ठप्प होणार आहे. गेल्या डिसेंबरपासून जेट एअरवेजच्या विमानांच्या उड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली होती. 
 
जेटच्या १२३ विमानांच्या ताफ्यापैकी केवळ पाचच विमाने कार्यरत होती. याशिवाय, जेट एअरवेजची आंतरराष्ट्रीय उड्डाणे यापूर्वीच ठप्प झाली आहेत. कंपनीत स्टेट बँकेने हिस्सा वाढविताना, १,५०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचे जाहीर केल्यापासून मात्र प्रत्यक्षात ३०० कोटींचाच वित्तपुरवठा झाल्याने जेटची देशांतर्गत उड्डाणांची संख्या दिवसागणिक कमी होत आली आहे. सुरुवातीला पूर्वेत्तर भारत तर नंतरच्या टप्प्यात दक्षिणेतील उड्डाणे कमी करण्यात आली होती. मध्यंतरी देणी थकल्याबद्दल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जेटचा तीन वेळा इंधनपुरवठाही खंडित केला होता.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

World Snake Day २०२६: जागतिक सर्प दिनाचा इतिहास, उद्दिष्टे आणि महत्त्व जाणून घ्या

शेतकऱ्यांना दुहेरी भेट: कर्जमाफीनंतर ४८,००० कोटी रुपयांची वीज बिलेही माफ

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मंजूर होणार एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला, यलो अलर्ट जारी

LIVE: हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments