बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (16:08 IST)

मोबाईल कंपन्याचा तुम्हाला त्रास तुम्ही करा या प्रकारे ट्राय कडे तक्रार

सध्या मोबाईलवरील कॉल ड्रॉपची समस्या अनेकांच्वाया डोक्ढयाला ताप बनली आहे. अनेकदा दिवसभरात दोन-चार कॉल ड्रॉप होतात. देशभरात असलेल्या अनेक नेटवर्कची ही समस्या असून, कॉल ड्रॉप झाल्यानंतर आपण पुन्हा एक दोनवेळा कॉल करुन, संभाषण संपवतो. मात्र आपण तक्रार करायच्या भानगडीत पडत नाही. आता मात्र टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने अशा समस्यांचं निराकरण करण्यासाठी अनेक अॅप उपलब्ध करुन दिली. कॉल ड्रॉप, केबल किंवा टीव्हीला मिळणारं नेटवर्क या सर्वांच्या तक्रारी तुम्ही येथे करु शकणार आहात. ट्रायचे माय कॉल अॅप (TRAI MyCall) आहे, त्यावरुन तुम्ही तक्रार करु शकता. TRAI कडे तक्रार कशी करायची? तर तुम्ही सर्वात आगोदर  MyCall app हे अद्ययावत अॅप डाऊनलोड करायचे आहे. हे डाऊनलोड केल्यानंतर अॅप आवश्यक परवानगी मागेल, जसे कॉन्टॅक्ट, कॉल हिस्ट्री, मेसेज, लोकेशन वगैरे ती द्यायची गरज आहे. तुमच्या फोनवरुन एखाद्याला कॉल करा किंवा एखाद्याला तुमच्या नंबरवर कॉल करायला सांगा आणि कॉल जसा कट किंवा डिस्कनेक्ट होईल, तेव्हा एक पॉप-अप विंडो तुम्सहाला दिसणार आहे. तिथे तुम्हा कॉलला रेटिंग देण्याबाबत विचारना होणार आहे. तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार संबंधित कॉलला तुम्ही रेटिंग द्यायचे आहे. जर तुमचा कॉल ड्रॉप झाला असेल, तर कॉल ड्रॉप बटणावर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर सबमिट बटण दाबा, तुमच्या समस्येची नोंद होईल. यामुळे तुमची तक्रार न ऐकणारा तुमच्या ऑपरेटरला ट्राय ही समस्या दूर करायला सांगेल सोबतच ती दूर झाली नाही तर दंड देखील देणार आहे.