Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साखर कारखानदारांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा

Updated: गुरूवार, 28 सप्टेंबर 2017 (12:52 IST)
 
साखरेचा साठा करण्याबाबत कारखान्यांवर आलेली बंधने आणि त्याचा साखरेच्या विक्रीवर व अर्थकारणावर होऊ शकणारा परिणाम या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसंच, कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आता ऊसाच्या जलव्यवस्थापनात मायक्रो-इरिगेशनचा पुरस्कार करत आहेत. मायक्रो-इरिगेशनखाली अधिकाधिक ऊस क्षेत्र येण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत हा उपक्रम घेऊन केंद्र व राज्यांच्या सबसिडी वाढवल्या पाहिजेत व साखर विकास निधीतून मिळणाऱ्या कर्जमर्यादा वाढायला हव्यात, अशी मागणी फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप-वळसे पाटील यांनी नोंदवली.
 
ज्यूटच्या पिशव्यांमध्ये साखरेचं पॅकिंग करण्याच्या सक्तीबाबत काही मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्याचाही विचार या बैठकीत करण्यात आला. सेफासु व सॉफ्ट लोन्सचे पुनर्गठन करण्याचीही मागणी पुन्हा एकदा याठिकाणी साखर कारखानदारांतर्फे करण्यात आली. सरकारने साखर कारखान्यांच्या मागण्या आणि समस्या गांभीर्याने समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे.
 
उसाचे चिपाड व शेतातील इतर कृषीकचरा गोळा करून जैविक इंधन म्हणून 15-20 टक्के मर्यादेत उपयोगात आणण्याची यंत्रणा राबवणे गरजेचे आहे.साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यावर विचार करून तोडगा काढण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

ठाण्यात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू, सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे निर्देश दिले

तेलंगणातील एका औषध कंपनीच्या अणुभट्टीमध्ये झालेल्या स्फोटात दोन जण ठार, १० जण जखमी

पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी एनएसयूआय-एबीव्हीपी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, गुन्हा दाखल

नाशिकात विवाहबाह्य संबंधातून एका ३४ वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक

शनिवार आणि रविवारच्या रात्री बोरिवली आणि भाईंदर दरम्यान ४ तासांचा जंबो ब्लॉक लागू

पुढील लेख
Show comments