शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (10:53 IST)

विदर्भात गारपीट, शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान

विदर्भाला गुरुवारी (2 जानेवारी) वादळी वारे आणि मुसळधार पावसानं झोडपलं. यावेळी गारपीटही मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय.
 
मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडला असून, याचा फटका विशेषत: सोलापुरातील पिकांना बसलाय.
 
तर मराठवाड्यात लातूर, परभणी, हिंगोलीतही पावसानं हजेरी लावलीय. नगरमध्ये द्राक्ष आणि कांद्याचं नुकसान झालं.
 
उत्तरेकडील राज्यांतून सध्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने राज्यात दोन ते तीन दिवसांपासून थंडीत वाढ झालीय. मात्र, वातावरणात होणारे बदल आणि मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंडीत अडथळा निर्माण होऊन राज्याच्या काही भागात ढगाळ स्थिती निर्माण होतेय.