शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (12:11 IST)

टोमॅटो : भाववाढीचा ग्राऊंड रिपोर्ट

कर्नाटक,हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र,गुजरात या राज्यात झालेल्या अतिवृष्टिने टोमॅटोचे नुकसान झालेले आहे.मागील तीन वर्षाचा टोमॅटोचा विचार केल्यास शेतकरी वर्गाला मिळलेल्या उतपन्नतुन झालेला खर्च ही निघलेला नव्हता त्यामुळे त्यांना आपला टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची नामुश्कि आलेली होती.याच कारणाने बऱ्याच राज्यातील शेतकरी वर्गाने यंदा टोमॅटोची कमी लागवड़ केलेली आहे.त्यामुळे यंदा टोमेटोचे उत्पादन हे कमी येणार असल्याने  ग्राहकांना अजून तरी दिलासा मिळणार नाही असे चित्र आहे.टोमॅटोची भाजी, कोशिंबीर नागरिकांच्या ताटातून गायब झाली आहे. टोमॅटो सर्वसामान्यांसाठी “आंबट’ बनले आहेत.यासाठी  केलेला ग्राउंड रिपोर्ट.

खुल्या बाजारात ग्राहकांना टोमॅटो  १०० ते १२० रुपये प्रति किलो दराने विकत घ्यावे लागत असताना मात्र शेतकरी वर्गाच्या टोमॅटोला होलसेल बाजारात ४० रुपये किलो ने दर मिळत आहे.दोन महिन्यापूर्वी हाच टोमॅटो २० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात होता.दोनच महिन्यात टोमॅटोचे भाव पाच पट वाढल्याने  देशात टोमेटोची चर्चा जोरात सुरु आहे.

टोमॅटो मध्ये मोठ्या व्यापर्याकड़ून नफेखोरी करुण अव्वच्या च्या सव्वा दराने विक्री सुरु आहे.प्रत्यक्षात या दरवाढीचा फायदा शेतकरी वर्गाला होताना दिसत नाही.देशातील सर्व सामान्य मानुस आणि शेतकरी वर्गाला फटका बसत आहे.

शेतकरी वर्गाला बाजार समितिमध्ये  टोमॅटोला ३० ते ४० रुपये किलो मिळत आहे.तर दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबाला टोमॅटोसाठी १०० रुपये ते १२० रुपये प्रति किलोने खरेदी करावा लागत आहे त्यामुळे मधले घटकाची यात चांदी होत आहे.देशामध्ये टोमेटोचे सर्वात जास्त उत्पादन हे महाराष्ट्र, कर्नाटक,हिमाचल प्रदेश या राज्यात होत असते.आशिया खंडातील कांद्याबरोबर टोमेटो साठी नाशिक जिल्ह्याच नाव घेतले जाते.येथील मुख्य बाजार समितित शेतकरी वर्गाला २० किलोच्या कैरेट साथी ७०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे

निफाड तालुक्यातील रानवड येथील टोमॅटो उत्पादक विनायक कुशारे यांनी ३० आर क्षेत्रात १०५७ वाण टोमाटोची लागवड केली आहे . त्याचा उत्पादन खर्च मला आतापर्यंत ६० ते ७० हजार रुपये झालेला आहे . त्यापैकी २० जाळ्या टमाटो ची चांदवड कृषी बाजार समितीत विक्री केली.प्रति जाळी प्रतवारीनुसार ४७५ रुपये प्रमाणे मला ९ हजार ७५३ रुपये मिळाले .त्यात वाहनखर्च व हमाली वगळता  मला आवगे २० रुपये प्रति किलो भाव मिळाला .मात्र हाच टमाटा विक्रिते बाजारात १०० ते १२० रुपये किलो ने विक्री करीत आहे .मात्र शेतक-यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही ही वस्तु स्थिति आहे.प्रति किलो ८० ते १०० रुपये नफा काढून  टोमॅटोची विक्री सुरु आहे.

मागील वर्षी टोमॅटोला दोन ते अडीच रुपये किलोने भाव।मिळला होता त्यामुळे या वर्षी येथील शेतकर्यनी सुधा टोमॅटोची।लागवड कमी।केलेली आहे.मिळलेल्या भावातुन उत्पादन खर्च ही न निघाल्याने त्यांनी तो रस्त्यावर फेकून दिलेले होता.

ग्राहकांना प्रतिकिलो 100 रुपयांनी मिळणाऱ्या टोमॅटोचे शेतकऱ्यांच्या हाती फक्त 20 ते 40 रुपये मिळत आहेत. टोमॅटो महाग झाला मात्र त्याचा फायदा नेमका कुणाला होत आहे .

टोमेटोचे भाव वाढीचा ग्राउंड रिपोर्ट

  • ग्राहकांना प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांनी मिळणाऱ्या टोमॅटोचे शेतकऱ्यांच्या हाती फक्त २० ते ४५ रुपये मिळत आहेत. टोमॅटो महाग  झाला मात्र त्याचा फायदा नेमका कुणाला होत आहे.
  • त्यावेळी व्यापाऱ्यांना मिळणारा टोमॅटो आणि ग्राहकांना मिळणारा टोमॅटो यांच्या दरात कमालीची तफावत दिसून आली.
  • व्यापाऱ्यांकडे असलेला टोमॅटो ४०० ते ९०० रुपये क्रेट आहे. म्हणजे शेतकऱ्याला प्रतिकिलो २० ते ४५ रुपये दर मिळत आहे. तर हाच टोमॅटो ग्राहकांना मात्र १००  ते १२०रुपये किलो दरानं विकला जात आहे.
  • त्यामुळे एकीकडे शेतकऱ्याची फसवणूक होते, तर दुसरीकडे ग्राहकाची लूट होते. तर प्रतिकिलो 40 ते 60 रुपये कुणाच्या खिशात जाताहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.