शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (16:37 IST)

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

टीव्ही जगात गाजत असलेल्या अग्गबाई सासूबाई या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारणार्‍या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. निवेदिता यांना सौम्य लक्षणे असून त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाइन केल्याचे समजते.
 
निवेदिता सराफ या प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ यांच्या पत्नी आहे. आणि सध्या छोट्या पड्यावर अग्गबाई सासूबाई ही मालिका खूप गाजत असून यातील कलाकारांनी खूप प्रसिद्धी कमावली आहे.
 
दरम्यान मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे डॉ. गिरीश ओक, तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की यांच्यासह इतर कलाकारांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.