गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 15 सप्टेंबर 2024 (14:40 IST)

Bigg Boss: आर्याला बिगबॉसच्या घरातून थेट घराबाहेर काढलं!

big boss marathi
सध्या कलर्स मराठी वाहिनीवर बिगबॉस मराठीच पाचवा सीजन गाजत आहे. सध्या रितेश देशमुख या कार्यक्रमाचे होस्ट करत आहे. या कार्यक्रमाच्या एका एपिसोड मध्ये आर्या आणि निकी मध्ये जोरदार भांडण झाले आणि वाद विकोपाला गेल्यावर आर्या निक्कीच्या कानाखाली लगावते. या मारहाणीमुळे बिगबॉस तिला तुरुंगात टाकतात.

रितेश देखील आर्याची क्लास घेतो. बिगबॉस मधून मारहाणीमुळे आर्याला बाहेर काढण्यात आले आहे. 
या निर्णयामुळे चाहते बिगबॉसच्या शो वर चांगलेच संतापले आहे. त्यांनी रितेश देशमुख आणि बिगबॉसवर चांगले नाराज झाले आहे. 

कॅप्टन्सीच्या टास्कच्या दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये जोरदार भाडं झालं. या झटापटीत आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. यावर बिगबॉसने तिला जेल मध्ये टाकलं आणि घरातून बाहेर काढले. 

या वर रितेश भाऊने देखील कार्याला सुनावली ते म्हणाले, तुम्ही स्वतःला काय समजता? रागाच्या भरात येऊन कोणावर देखील हात उचलणार ? स्वतःच्या रागावर नियंत्रण नाही? या घरात अनेकदा झटापटी झाली मात्र कोणी हात उगारला माही.तुम्ही हे सर्व काही जाणीवपूर्व केले आहे. या आठवड्यात आर्याला बिगबॉसच्या घरातून बाहेर काढले आहे.

चाहत्यांना बिगबॉसचा हा निर्णय पटलेला नसून विरोध करत आहे. यामुळे चाहत्यांचा पाठिंबा मिळत आहे. निक्कीच्या वागण्यामुळे प्रेक्षक संतापले असून आर्याने बरोबर केले अशी प्रतिक्रिया देत आहे. 
Edited By - Priya Dixit