दगडी चाळ 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रुपेरी पडद्यावर अवतरणार

Last Modified सोमवार, 20 जून 2022 (19:23 IST)
मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पाहणार्‍या अरुण गवळी आणि त्यांचे सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ आपल्या सर्वानाच माहीत आहे. पण गँगवॉर्समध्ये अडकलेल्या मुंबईत हा वाम मार्ग तेव्हा काही सगळ्यांनीच राजीखुशीने निवडला नव्हता. अशाच प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने या प्रवाहात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्यावर चित्रित झालेला मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेला अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता अंकुश चौधरी अभिनित दगडी चाळ हा रंजक मराठी चित्रपटप्रेक्षकांच्या भेटीला

2 ऑक्टोबर 2015 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये फुलत जाणारी प्रेमकथा पाहायला मिळाली.दगडी चाळीचा थरार दाखवणारा 'दगडी चाळ' चित्रपट आला होता. त्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता या चित्रपटाचा दूसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतीच त्याची तारीख जाहीर करण्यात आली.

आता या चित्रपटाचे सिक्वल म्हणजे दुसरा भाग दगडी चाळ2
देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चुकीला माफी नाही' असं म्हणणाऱ्या अरुण गवळींचा ( Arun Gawli) म्हणजे डॅडींचा ( Daddy) दबदबा पुन्हा एकदा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दगडी चाळ चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे (makarand deshpande) यांनी अरुण गवळींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातही मकरंद देशपांडेच अरुण गवळींच्या भूमिकेत आहेत. पूजा सावंतने दगडी चाळ 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. संगीता अहिर प्रदर्शित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून अभिनेता अंकुश चौधरी (ankush chaudhari) आणि मकरंद देशपांडे यांनी चित्रपटाचा टीझर शेयर केला आहे.येत्या18 ऑगस्टला 'दगडी चाळ 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या टीझर मध्ये भर पावसात तुडुंब भरलेल्या गर्दीतून अरुण गवळी एंट्री घेत आहेत असं दाखवण्यात आले आहे.
टिझरला एक सुंदर कॅप्शन दिले आहे, 'डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव म्हणजे दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’,
चित्रपटाच्या पहिल्या भागात अंकुश आणि अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) हिची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली. विशेष म्हणजे 'दगडी चाळ 2' मधेही अंकुश आणि पूजा आपल्या भेटीला येणार आहेत. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.

यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Statue of Unity :स्टॅच्यू ऑफ युनिटी, लोकप्रिय पर्यटन ...

Statue of Unity :स्टॅच्यू ऑफ युनिटी, लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक, एकदा तरी भेट द्या
गुजरातमध्ये पर्यटनाची अनेक केंद्रे असली तरी, भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले ...

निदान पँट तरी घालायची ना!’ नेटकऱ्यांकडून कियारा अडवाणी

निदान पँट तरी घालायची ना!’ नेटकऱ्यांकडून कियारा अडवाणी ट्रोल
अनेक चित्रपटांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी. ‘कबीर ...

Marathi Joke: बायकोचा राग

Marathi Joke: बायकोचा राग
रात्री नवरा बायकोचं भांडण झालं, सकाळी बायको रागात उठलीच नाही, बिचाऱ्या नवऱ्यानं ...

Mukesh Khanna: मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुकेश ...

Mukesh Khanna:  मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुकेश खन्ना यांच्यावर महिला आयोगाची कारवाईची मागणी
अभिनेते मुकेश खन्ना आता मुलींबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे अडकल्याचे दिसत आहे. ...

Marathi Joke: बायकोची सवय

Marathi Joke: बायकोची सवय
नवरा बायको हातात हात धरून बाजारात फिरत होते त्यांना पाहून नवऱ्याचा मित्र म्हणाला- अरे वा ...