गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2019 (09:41 IST)

गोवा मराठी चित्रपट महोत्सव सुरु

गोवा मराठी चित्रपट महोत्सवास (गोमचिम) सुरूवात झाली आहे. महोत्सवात 18 चित्रपट, तर 3 लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या महोत्सवाला सिनेप्रेमीचा भरभरून प्रतिसाद लाभत असून कला अकादमीत प्रदर्शित करण्यात आलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाला सिनेप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. आयनॉक्स व मेकनिझ पॅलेसमध्ये प्रदर्शित चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद आहे.  
 
कला अकादमीत आज बस्ता, मोगरा फुलला, होडी हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. आयनॉक्समध्ये नाळ, म्होरक्या, कागर, दिठी, खटला बिटला हे चित्रपट तर मॅकेनिझ पॅलेस 1 मध्ये वेडिंगचा सिनेमा, डोंबीवली रिटर्न, चुंबक, इमेगो, भोंगा हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. मॅकेनिझ पॅलेस 2 मध्ये अहिल्या, आरोन, लघुपट - पोस्ट मॉर्टम, गधूळ, पाम्पलेट, सुर सपाटा हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. 1930 वास्को येथे सुर सपाटा, आरोन हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.