Daily Horoscope
✕

“थिएटर ऑफ रिलेव्हन्स ”नाट्यदर्शनाचा २५ वर्षपूर्ती सोहळा १८,१९,20 डिसेंबर २०१७ रोजी

Updated: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (11:46 IST)
 
“थिएटर ऑफ रेलेवंस”चे सिद्धांत :
1. असा रंगकर्म ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
2. कला, कलेसाठी नसून समाजाप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करणारी असावी आणि हि कला लोकांच्या जीवनाचाच एक हिस्सा असावी.
3. कला जी मानवीय गरजांना पूर्ण करेल आणि स्वतःला अभिव्यक्ति माध्यमाच्या रुपात व्यक्त करेल.
4. जी स्वतःतील बदलांच्या माध्यमांचा शोध घेईल, स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे घेऊन जाईल.
5. असा रंगकर्म जो मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे स्रोत वा पद्धती बनेल.
(रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस”चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस”चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस”नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे.)
 
आज विकासाच्या नावाखाली एकच चढाओढ सुरु झालेली आहे. या चढा ओढीत एकाधिकाराचा सर्वीकडे गोंधळ सुरु झालेला आहे. गर्दीचा आवाज आणि कोलाहल यामध्ये आपला आवाज ,आपल्या अंतकरणातील आवाज हा दबला जात आहे. किंबहुना त्याला दाबण्याचा षड्यंत्र सुरु झालेला आहे. यातच, आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात,  माणसाने “माणूस”म्हणून राहणे हे एक आव्हान झाले आहे. मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “गर्भ”,“अनहद नाद – Unheard Sounds of universe”आणि “न्याय के भंवर में भंवरी”या क्लासिक नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आंतील आवाज ऐकवण्यासाठी, ही तीन कलात्मक नाटके घेऊन येत आहोत.
 
या तिन्ही नाटकांची प्रस्तुती पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून तारीख आणि वेळ पुढीलप्रमाणे :
१८ डिसेंबर रोजी रात्री 8.30  वाजता 'गर्भ' -
" गर्भ " - हा एक संघर्ष आहे आपल्या अस्तित्वाच्या निर्माणाचा, हा संघर्ष आहे माणसाचा "माणूस" म्हणून जगण्याचा, मानवतेला वाचवण्याचा, समाजाने आपल्या सोयीसाठी बनवलेल्या विचार धारणांना तोडून स्वतःकडे पाहण्याचा आणि विश्वाला सुंदर बनवण्याचा! हे नाटक एक सकारात्मक दृष्टीचा निर्माण करतं, जन्म संयोगापासून, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा, रुढीवादी संस्कार, समज, वैचारिक जडत्व हे देखील जन्म घेतात आणि यांपासून कितीही दूर जाण्याचा प्रयज्ञ केला तरी ते आपली पाठ सोडत नाहीत याच जडत्वाला तोडून आपल्याला उन्मुक्तता देते "गर्भ"! या नाटकाच्या माध्यमाने जगभरात होत असलेल्या वंशभेद ,जातिभेद, धर्म, आणि राष्ट्रवादाच्या ओढाताणीत अडकलेल्या किंवा लुप्त होत असलेल्या  मानवतेला वाचवण्याची संघर्ष गाथा अतिशय सौंदर्यासह सादर पहायला मिळते.
 
१९ डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता 'अनहद नाद unheard sounds of universe' -
“अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ”हे नाटक कलात्मक गरजांचा शोध घेतं. जे कला व कलाकाराला उत्पादिकरणाच्या बंधनातून मुक्त करते. कारण, कला हि उत्पाद आणि कलाकार हा उत्पादक नाही आणि जीवन नफा - तोट्याची बैलेंसशीट नाही. याचकरिता हे नाटक, कला आणि कलाकाराला उत्पाद आणि उत्पादिकरणांमुक्त करते. त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक उर्जेने उत्तम आणि सुंदर विश्व निर्मिती करण्यासाठी प्रेरित आणि प्रतिबद्ध करते.
 
२० डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता
'न्याय के भंवर में भंवरी' होणार आहे.
नाटक “न्याय के भँवर में भंवरी”मध्ये मानवी सभ्यतेच्या उदयापासून ते आजतागायत पितृसत्तेतून उगम पावलेल्या शोषणकारी आणि दडपशाही प्रवृत्ती ने स्रीच्या सामाजिक न्याय आणि समतेचा बळी घेतला आहे व कशाप्रकारे ह्या पुरुषप्रधान समाजात परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली स्रीला गुलामीच्या बेड्यात अडकवण्याचे षडयंत्र रचले गेले, याचे सखोल विस्तारित वर्णन आणि विश्लेषण पाहायला मिळते. ह्या नाटकाच्या माध्यमाने पितृसत्ताक व्यवस्थेला आणि समाज रचनेला प्रहार करून ,एका न्यायसंगत आणि समानताप्रिय समाजाची निर्मिती करण्याचा संदेश मिळतो.
 
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ”आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल. येथे अनुक्रमे १८ डिसेंबर २०१७ ला रात्रौ ८.३० वा, १९ डिसेंबर २०१७ला सायं. ५.०० वा. आणि 20 डिसेंबर २०१७ रोजी रात्रौ ८.३० वाजता होईल.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

“मेरी आँखों में झाँको!”; कोण होणार करोडपतीच्या मंचावर माधुरीने हुबेहूब केली नम्रताची नक्कल!

मुंबईच्या अंडरवर्ल्डची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाणार, हर्षवर्धन राणे ही भूमिका साकारणार

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

इंस्टाग्रामवर १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध इंफ्लुएंसरने केली आत्महत्या

६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्रातील तीन कलाकारांना ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

पुढील लेख
Show comments